आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरा, सुषमांचा राजीनामा मागणे चुकीचे - शशी थरूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - माजी मंत्री शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पक्षाने मांडलेल्या भूमिकेविरोधात मत व्यक्त केले आहे. ललित मोदी प्रकरणात कॉँग्रेसने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंंत्री वसुुंधराराजे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. परंतु थरूर यांनी त्यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

थरूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, राजीनाम्याची मागणी करणे िकंवा बाहेरच्या दबावाखाली राजीनामा देणे दोन्ही बाबी चुकीच्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत थरूर म्हणाले, पाकसोबत प्रत्येक वेळी चर्चा केली तेव्हा आपल्यासोबत धोका झाला आहे. पाकमधील अंतर्गत परिस्थिती तेथील लष्कर ठरवते व नियंत्रित करते. आपण चर्चा नेत्यांसोबत करतो. अशा स्थितीत बोलणी यशस्वी होण्याची शक्यता अतिशय धूसर आहे.
योगदिनासाठी केले पंतप्रधानांचे कौतुक
थरूर म्हणाले, पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जागतिक योग दिवस साजरा झाला. संपूर्ण जगभरात योग केला गेला. ही देशासाठी चांगली बाब आहे. पंतप्रधान मोदींचा पुढाकार व अभियान नक्कीच कौतुक करण्याजोगे आहे. परंतु त्याचे आयोजन केवळ वर्ल्ड रेकॉर्ड समोर ठेवून केले गेले हे योग्य नाही. आम्हाला आपला वारसा अधिक गांभीर्याने पुढे न्यावा लागेल.