आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाद्रमुकमधून व्ही.शशिकलांसह पुतण्याला हाकलले, पलानीस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेेन्नई - तामिळनाडूत नाट्यमय घडामोडींत मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या मंत्रिमंडळाने अण्णाद्रमुकच्या (अम्मा) सरचिटणीस व्ही. के. शशिकला व सहसरचिटणीस टी.टी. व्ही. दिनकरन यांच्याविरुद्धच बंडाचे निशाण उभारत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पक्ष व सरकारपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना पक्ष आणि सरकारपासून पूर्णत: दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष कार्यकर्ते व लोकांच्या आशा-आकांक्षांप्रमाणे एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री डी. जयकुमार यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सल्लामसलत बैठकीनंतर केली. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा सचिव, खासदार, आमदार आणि मंत्र्यांची हीच इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाचे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी लवकरच एक समिती स्थापण्यात येणार आहे. दिनकरन यांची जयललिता यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. शशिकला यांनी त्यांना पुन्हा पक्षात घेऊन पक्षाचे पद दिले होते.
 
एेक्याचा मार्ग माेकळा
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये दोन गट पडले आहेत. एकीकरणासाठी शशिकला व दिनकरन यांची पक्ष व सरकारमधून हकालपट्टी करण्याच्या मागणीवर माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्व्हम गट अडून बसल्याने बोलणी थांबली होती. त्या पार्श्वभूमीवर ही अचानक घोषणा झाली. त्यामुळे एेक्याचा मार्ग माेकळा झाला अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...