आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shatrughna Sinha Meet Nitishkumar And Lalu Yadav

‘बिहारी बाबू’ भेटले नितीश, लालू यादवांना, दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र भेटीमुळे चर्चेला उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाह समारंभात सिन्हा-नितीश कुमार बोलताना. - Divya Marathi
विवाह समारंभात सिन्हा-नितीश कुमार बोलताना.
पाटणा - अभिनेता तथा नेते शत्रुघ्न सिन्हा आणि भाजप यांच्यातील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शत्रुघ्न यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांची स्वतंत्र भेट घेतली. त्यामुळे सिन्हा आणि भाजप यांच्यातील दरी वाढत चालली आहे, अशा अनेक तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

पाटणासाहिबचे खासदार असलेले शत्रुघ्न यांनी लालूंची मंगळवारी पाटण्यातील विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली. लालूंसमवेत पत्नी तथा माजी मुख्यमंत्री राबडी देवीदेखील होत्या. या वेळी लालूंनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. भाजपला तुम्ही एकहाती आव्हान देत आहात, ही गोष्ट मानावीच लागेल, असे राजद प्रमुखांनी बोलून दाखवली, असे सूत्रांनी सांगितले. भाजपकडून सिन्हा हे पाटणासाहिब मधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. दुसरीकडे त्यांनी एका विवाह समारंभात नितीश कुमार यांचीही भेट घेतली. उभय नेत्यांत सोमवारी रात्री ही भेट झाली. दोघांनीही अनेक खासगी गोष्टींबद्दल चर्चा केली. खरे तर निवडणुकीचा काळ चांगला होता, असे म्हणावे लागेल. कारण त्या वेळी आमची किमान भेट तरी व्हायची; परंतु आता तीदेखील होत नाही. म्हणूनच आम्ही आता पुन्हा-पुन्हा भेट घेतली पाहिजे, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. भेटीचा तपशील सांगण्यास मात्र सिन्हा यांनी नकार दिला. एकदा मित्र झाल्यानंतर तो कायमचा मित्र असतो, असे मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यामुळे आमच्या संबंधांकडे राजकीय दृष्टिकाेनातून पाहू नका. ही मैत्री कायमची आहे, असे सिन्हा म्हणाले.
बिहार निवडणुकीत दुफळी चव्हाट्यावर
भाजपमधील नेत्यांची नाराजी आणि दुफळी बिहारमधील विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आली होती. निवडणुकीसाठी आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप सिन्हा यांनी जाहीरपणे केला होता. दुसरीकडे नितीश कुमार यांनी सिन्हा बिहारचा अभिमान आहेत, असे सांगून त्यांना पाठिंबा दिला होता. तेव्हापासून शत्रुघ्न सिन्हा आणि भाजप यांच्यातील संबंध अधिक ताणले जात आहेत.

अगोदरही वाद
अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीच्या निर्णयावर सिन्हा यांनी जाहीरपणे सरकारच्या धोरणावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत धडाडीचे नेतृत्व करत आहेत, परंतु त्यांना सल्ला देणारी मंडळी चुकीच्या पद्धतीने सल्ले देते. त्यातून निर्णय चुकतात, अशी तोफ त्यांनी डागली होती. तेव्हादेखील ते चर्चेत आले होते. राजकीय वर्तुळात सिन्हा सातत्याने वादात आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, ‘लालूंनी केले आचारसंहितेचे उल्लंघन’