आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने शत्रुघ्न सिन्हांना वगळले, आंबेडकर जयंती कार्यक्रमाला निमंत्रण नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भाजपने येथे आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्षांनी मला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याचे ते म्हणाले. सिन्हा यांनी निमंत्रण नसल्यामुळे कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले.

अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, राधामोहन सिंग, राजीव प्रताप रुडी आणि गिरिराज सिंग यांच्याशिवाय राज्यातील नेते सुशील कुमार मोदी आणि नंद किशोर यादव यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. बॉलीवूडमध्ये करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची हानी व्हावी,असा स्वप्नातही विचार केला नाही. राज्यातील नेत्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाची अकारण भीती सतावते, त्यामुळे त्यांनी कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सिन्हा यांनी सांगितले. मात्र, त्यांनी कोणत्याही नेत्याच्या नावाचा उल्लेख केला नाही. आपल्या सहभागाशिवाय पक्ष बिहारमध्ये विजय संपादन करेल काय, या प्रश्नावर मी त्यांना शुभेच्छा देतो, एवढीच प्रतिक्रिया दिली.

कार्यक्रमस्थळी लावलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्समध्ये सिन्हा दिसत नसल्याची विचारणा सुशीलकुमार मोदी यांना केली होती.