आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाढी करणे,कापणे इस्लामबाह्य काम! ‘दारूल’चा फतवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर- दाढी करणे इस्लामबाह्य काम आहे. दारूल- उलुम देवबंदने हा दावा केला असून त्यामुळे नवा वाद सुरू झाला. उत्तर प्रदेशातील देवबंदस्थित दारूल - उलुमने कटिंग-दाढीचे सलून चालवणाऱ्या महंमद इर्शाद आणि महंमद फुरकाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल हा निर्णय सुनावला. दाढी करणे किंवा ती कापणे इस्लामबाह्य आहे. शरिया कानून त्याची परवानगी देत नाही. जे लोक हे काम करतात त्यांनी ते सोडून देऊन दुसरे काही तरी काम करावे, असा फतवा दारूल उलूमने जारी केला आहे. त्यानंतर देवबंदमधील काही सलून संचालकांनी दाढी करणे बंद केले आहे.