आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • She Kidnapped For The Tenth Children, Finally Escaped

दहा मुलांसाठी ती स्वत: अपहृत झाली, शिताफीने स्वत:ची सुटका केली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसाममधील शिवसागर जिल्ह्याच्या 14 वर्षीय गुंजन सरमाने असामान्य धाडसी वृत्तीचे दर्शन घडवले. केंद्रीय विद्यालयात आठवीत शिकणारी गुंजन इतर विद्यार्थ्यांसह स्कूल व्हॅनमधून घरी परतत होती. रस्त्यात एका बंदूकधारी व्यक्तीने व्हॅनसह मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. गुंजनने, ‘पाहिजे तर माझे अपहरण करा, मात्र इतर 10 मुलामुलींना सोडा,’ अशी विनवणी अपहरणकर्त्याला केली. जंगलात रात्रभर अपहरणकर्त्याच्या ताब्यात असलेल्या गुंजनने सकाळी शिताफीने स्वत:ची सुटका करत पळ काढला.
ही घटना बुधवारी घडली, मात्र 48 तासांच्या आत गुंजनच्या धाडसाची वार्ता आसामच्या कानाकोप-यात दुमदुमली. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी गुंजनला दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच राष्‍ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी तिचे नाव पाठवले जाईल. गुंजनचे वडील शंकर सरमा हे दुकानदार आहेत. विद्यार्थ्यांच्या व्हॅनला चहाच्या मळ्यापर्यंत नेणारा ड्रायव्हर उमानंद सैकिलाही पुरस्कृत करण्यात आले. अपहरणकर्त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
गुंजनची आपबीती
अपहरणकर्त्याच्या तावडीतून वाचल्यानंतर गुंजनने आपली आपबीती सांगितली. ती म्हणाली, ‘बंदूकधा-याने बुधवारी दुपारी 2.15 वाजता व्हॅन रोखली. तो व्हॅनमधील 12 मुलांना जंगलात फिरवत राहिला. त्याने गोळीबारही केला. ड्रायव्हरने एका चहा मळ्याजवळ व्हॅन थांबवल्याने तो घाबरला. त्याने अनन्या बर्गोहेन या मुलीस पकडून इतरांना मागे येण्यास दरडावले. मी त्याला म्हणाले, बाकीच्यांना सोडून द्या, पाहिजे तर माझे अपहरण करा. तो मला घेऊन जंगलात पळाला. माझ्या डोक्यावर पिस्तूल रोखत तो रात्रभर झुडपांत दडून बसला. पहाटे त्याने मला सांगितले की, कुठेही जाऊ नको, मी लगेच परत येतो. काही वेळेनंतर तो परतला नसल्याचे पाहून मी धूम ठोकली. एका चहाच्या मळ्यात जाऊन लोकांना अपहरणाची माहिती दिली.’