आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहजादचा 'शहजादा' विरोधात पुन्हा हल्लाबोल, म्हणाला 'डमी उमेदवारही उभा केला जाऊ शकतो'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राहुल गांधींचा नातेवाईक असलेल्या शहजाद पुनावाला यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. सोमवारीही पुनावाला यांनी दोन ट्वीट केले. एकामध्ये त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात काँग्रेस डमी कँडिडेट उतरवू शकते असे म्हटले. तसेच ही निवडणूक नसून नियुक्ती असल्याचा पुनरुच्चारही केला. पूनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रिया आणि घराणेशाहीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. 


'मला सफदर हाशमी बनायचे नाही'
- शहजाद यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, पार्टीतील एका व्यक्तीनेच मला सांगितले की, सल्लागार राहुल गांधींच्या विरोधात डमी उमेदवार उभा करण्याच्या विचारात आहेत. माझ्या शुभचिंतकांनी मला म्हटले की, आज काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन दूसरा सफदर हाशमी बनू नकोस. माझ्या पक्षाच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. 
- शहजाद यांनी या ट्विटमध्ये काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा लेखही अटॅच केला. त्यात त्यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच शहजादचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याबाबत मोदींनी केलेले ट्विटही शेअर केले. 
- 1 जानेवारी 1989 ला गाझियाबादच्या साहिबाबातमध्ये सफदर हाशमी यांची काँग्रेसचे मुकेश शर्मा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली होती. त्यावेळी ते नगर पालिका निवडणुकीत सीपीएम उमेदवाराच्या समर्णार्थ पथनाट्य करत होते. 


'निवडणूक नव्हे नियुक्ती'
- दुसऱ्या ट्वीटमध्ये शहजादने राहुल गांधी काँग्रेस ऑफिसमध्ये पोहोचतण्यापूर्वीचा एक फोटो अटॅच करत लिहिले होते, ही निवडणूक नसून नियुक्ती आहे. 
- कौतुक केल्याबद्दरल शहजादने मोदींचे आभारही मानले. 
- मोदींनी रविवारी म्हटले होते, तुम्ही धाडसाचे काम केले आहे. पण दुखःद बाब म्हणजे नेहमीच असे होते. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील गोंधळ शहजाने समोर आणला आहे. काँग्रेसने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडिया ग्रूपमधून त्यांना काढले. ज्यांच्या पक्षातच लोकशाही नाही, ते जनतेसाठी काम करू शकत नाहीत. 

 

राहुल गांधींच्या ऑफिसने केला अपमान 
- कांग्रेसमधील घराणेशाहीतच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शहजादने रविवारी न्यूज एजन्सीला इंटरव्ह्यू दिला. 
- शहजाद म्हणाला, मी रविवारी राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये फोन केला. मला त्यांना सर्व सांगायचे होते. त्यांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांची काही नातिक जबाबदारी आहे, हे मला त्यांना सांगायचे होते. ही निवडणूक प्रक्रिया थांबवण्यास मी सांगणार होतो. पण राहुल गांधींच्या ऑफिसमधून माझा अपमान झाला. 
- एका प्रश्नाच्या उत्तरात पुनावाला म्हणाले, आधी काँग्रेस नेत्यांनी सरदार पटेलांचाही अपमान केला होता. मलाही तसेच नाटत आहे. मी घराणेशाहीवर बोललो तर मी पक्षातच नाही असे म्हणू लागले. 
- तीन वर्षांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या ऑफिसकडून माझ्याशी संवाद साधला जात आहे, तरीही ते म्हणतात मी पक्षातच नाही. मी तर व्हिसल ब्लोअर बनलो आहे. 

 

पुढे वाचा, शहजाद यांनी रविवारी केले ट्वीट्स..

बातम्या आणखी आहेत...