जयपूर - किन्नरांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी जयपूरच्या कालवाड रोडवर गोवींदपुरा येथे किन्नरांनी चांगलाच उच्छाद घातला. गोविंदपुरा येथे एका घरी गृहप्रवेशाचा सोहळा होता. येथे दोन किन्नर आले आणि त्यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली. घरमालकाने एवढे देण्यास नकार देत श्रद्धेनुसार जे दिले ते स्वीकार करण्याचा आग्रह केला. त्यावर हंगामा करत किन्नरांनी त्याठिकाणी अशोभनीय कृत्य केले.
काही लोकांना शंका आल्याने त्यांनी त्या दोघांना पकडले. या दरम्यान त्याठिकाणी आणखी काही किन्नर आले. त्यांनी त्या दोघांना लोकांच्या तावडीतून सोडवले आणि त्यांची धुलाइ करण्यास सुरुवात केली. ते दोघे नकली किन्नर असल्याचे नंतर आलेल्या असलींनी सांगितले. दरम्यान कोणीतरी पोलिसांना फोन केल्याने दोन शिपाई तेथे आले. पण किन्नरांनी त्या दोन बनावट किन्नरांना पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. नंतर त्याठिकाणी चांगलाच गदारोळ झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे PHOTOS