आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅग्ज ऑफ पंजाब: जेल ब्रेकनंतर FB वर धमकी, एन्काऊंटर केले तर वाईट होईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाला/जालंधर (पंजाब)- नाभाच्या जेलमधून फरार झालेला शेरा खुब्बन गॅंगच्या चार तरुणांची कहाणी झारखंडच्या धनबादमधील एका गावावर तयार करण्यात आलेल्या गॅंग्ज ऑफ वासेपूरपेक्षाही भयंकर आहे. पोलिसांचे दुर्लक्ष यामध्ये मोठा रोल प्ले करतो. ही गॅंग सोशल मीडियावर तुरुंगात अॅक्टिव्ह राहते. काय करत आहेत, काय करणार आहेत, याची बहुतेक माहिती फेसबुक-व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर केली जाते.
सरकारला धमकावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर
- तुरुंगातून पळाल्यानंतर बादल सरकारला धमकावण्यासाठी या गॅंगच्या सदस्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. या गॅंगच्या सदस्यांचे हजारो सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत.
- सुरवातीला पोलिसांना वाटले होते, की खालिस्तान लिबरेशन फोर्सचा दहशतवादी हरमिंदरसिंग मिंटू याने हा कट रचला असावा.
- पण आता असे समोर आले आहे, की शेरा खुब्बन गॅंगच्या सदस्यांनीच हा कट रचला. त्याची अंमलबजावणी केली.
- या गॅंगच्या विक्की गाऊंडर आणि नीटा दयोल यांनीच यात प्रमुख भूमिका बजावली आहे.
- सोशल मीडियावर यांचे मेसेजेस आणि व्हॉट्स अॅप वरुन स्पष्ट झाले होते, की विक्की आणि नीटा सहकाऱ्यांसोबत तुरुंगातून पळणार आहे.
- विशेष म्हणजे आता शेरा खुब्बन गॅंगने आता बादल सरकारला खुली धमकी दिली आहे. आमच्या सहकाऱ्यांचा एन्काऊंटर केला तर याचे वाईट परिणाम होतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पंजाबमधील या गॅंगच्या सदस्यांचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...