आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाच्या पित्याला दोन कोटींचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पिता सुरेंद्र शेट्टी यांना पतजंली आयुर्वेदच्या धर्तीवर योगपीठ व हर्बल औषधी कंपनी बनवण्याचे स्वप्न दाखवून एकाने दोन कोटी रुपयांनी फसवले. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशात मेरठ जिल्ह्यात जाऊन मवाना येथे एका व्यक्तीस अटक केली आहे. त्याचे नाव बाबा देवेंद्र असे असून त्याने शिल्पाचे पिता सुरेंद्र यांना व्यवसायाची मोठमोठी स्वप्ने दाखवली व त्यांच्याकडून दाेन कोटी रुपये उकळले होते. त्यांनी याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिम ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी तपास करून ही कारवाई केली अाहे.