आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमला : एका दिवसात ४५ सेंमी बर्फवृष्टी, विक्रम निघाला मोडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : सतनाम गिल - Divya Marathi
छायाचित्र : सतनाम गिल
सिमला- सिमला येथे बर्फवृष्टीने शनिवारी २० वर्षांचा विक्रम मोडला. एकाच दिवसात ४५ सेंमीपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली. बर्फामुळे राष्ट्रीय महामार्गासह पाचशेपेक्षा जास्त रस्ते बंद झाले आहेत. सगळीकडे एक ते दीड फूट बर्फाचा थर पसरला आहे. वीज-पाणी-फोन सर्वकाही ठप्प आहे. शोघी, तारादेवी, घनाहटी आणि कुफरीसह अनेक भागांत शेकडो यात्रेकरू अडकलेले आहेत.  राज्य परिवहन मंडळाच्या ९०० पेक्षा जास्त मार्गांवर शनिवारी बस धावल्या नाहीत. दोनशेपेक्षा जास्त बस रस्त्यातच अडकल्या आहेत. सिमला-कालका रेल्वे मार्गही शनिवारी सकाळी नऊ वाजेपासून बंद झाला. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना आठ किमी चालत सिमला येथे यावे लागले. सिमल्याव्यतिरिक्त सोलनमध्येही बर्फवृष्टी झाली. प्रशासनाने रस्त्यांवरील बर्फ हटवण्यासाठी स्नोकटरसह इतर यंत्रे आणली आहेत, पण सातत्याने बर्फवृष्टी होत असल्याने रस्ते ठप्प आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार रविवारी थोडासा दिलासा मिळू शकतो.
 
 
बातम्या आणखी आहेत...