आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shimla Is Approximately 300 Meters Bus Falls Into Gorge, 22 Killed, Three Injured

शिमला : 300 फूट खोल दरीत कोसळली बस, 22 प्रवासी ठार, 3 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - दरीत कोसळलेली बस.

शिमला - हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाहून सुमारे 70 किमी अंतरावर राज्य परिवहन महामंडळाची एक बस मंगळवारी 300 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही बस शिमलाहून खड्डकडे जात होती.
मजैलू गांवाजवळ कढारघाटपासून दोन किलोमीटर अलिकडे हा अपघात घडला. या गुर्घटनेनंतर स्थानिकांनी मदत आणि बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने पोलिस घटानास्थळी पोहोचले. प्रशासनाने घटनास्थळीच मृतांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वनाधीनही केले. दरम्यान, परिवहन विभागाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
एकाच कुटुंबातील पाच ठार
या बस अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. माहेराहून येणा-या दोन जावा आणि त्यांच्या तीन मुलांनी या दुर्घटनेमध्ये प्राण गमावले.
बसमध्ये अडकले होते प्रवासी
दुर्घटना झालेल्या बसमध्ये अनेक प्रवासी बराचकाळ दबलेले होते. बस उपडी पडलेली असल्याने प्रशासनाने आतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ही बस सरळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले.