आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shimla, Manali Snow News In Marathi, Himachal Pradesh

धुसर-रोमॅंटिक हिमवृष्टीने सिमला, मनालीत अवतरला स्वप्नासम स्वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला- सिमला आणि मनाली या हिमाचल प्रदेशातील पर्यटक स्थळांवर सतत हिमवृष्टी सुरू असून बारीक भुसभुसीत बर्फाची चादर पसरली असल्याने उत्साही पर्यटकांची संख्या वाढत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशासह इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उत्तरेत थंडीची लाट पसली आहे.
सिमला आणि मनालीत हिमयुक्त वारा वाहत असल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. या शहरांमधील किमान तापमान चक्क 1 डिग्री सेल्सिअसवर आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सिमल्यात 4 सेंटीमीटर बर्फ पडला असून 21.8 एमएम पाऊस पडला आहे. कुल्लू जिल्ह्यातील मनालीत आज पहाटेपासून हिमवृष्टीस सुरवात झाली आहे.
लहाऊल, स्पिटी, चंम्बा, मंडी, कुल्लू, किन्नाऊर, सिरमाऊर आणि सिमला या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठी हिमवृष्टी होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
दरम्यान, आज सकाळी लखनौसह उत्तर प्रदेशातील काही प्रमुख शहरांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. उद्याही या भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.