आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी पीएमसाठी काशीत पुन्हा होणार देव दिवाळी, आरतीसाठी घाटांवर गालिचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - काशीत ५४ वर्षांनंतर एखाद्या देशाचे प्रमुख येत आहेत. यापूर्वी १९६१ मध्ये राणी एलिझाबेथ आल्या होत्या. १२ डिसेंबरला नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे येथे असतील. त्यांच्यासाठी दशाश्वमेध घाटासह जवळच्या घाटांवर देव दिवाळीसारखी रोषणाई केली जाईल. १२ दिव्यांची गंगा आरतीही होईल.

गेल्या ७ दिवसांपासून दशाश्वमेध घाटावर दर अर्ध्या तासाने कोणता ना कोणता अधिकारी भेट देतो. पाहुण्यांसाठी १२ डिसेंबरला घाट फुलांनी सजवून रेड कार्पेट अंथरले जाईल. मंगळवारी रात्री एसपीजीचा चमू येथे आला आहे. गंगा आरतीसाठी ७२ फूट लांब व १८ फूट रुंदीची दोन व्यासपीठे उभारली जात आहेत. लष्कराची सॅपर्स इंजिनिअर टीम बुधवारी दुसरे व्यासपीठ उभारेल. ११ तारखेला घाटांवर लष्कर, नौदलाचा ताबा असेल. या दोन दिवशी तेथील नावाड्यांनाही घाटांवर जाण्याची मुभा नसेल. मोदी व अॅबे नौदलाच्या बोटीने घाटांना भेटी देतील. वायुदलाकडून हवाई निगराणी होईल. एनडीआरएफ व जल पोलिसांची ६ पथके पाण्यात शोधमोहीम राबवतील. घाट, मंदिरे व महालांवर शार्पशूटर असतील. ड्रोन व सुमारे १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर असेल. जपानी सुरक्षा पथक ३ दिवसांपूर्वी दखल झाले आहे. ते रोज गंगा आरती व इतर स्थळांना भेटी देत आहे. जपानच्या क्योटो शहरात झीरो होर्डिंग पॉलिसी आहे. यामुळे अॅबेंच्या मार्गावरून होर्डिंग काढली जात आहेत. अॅबे दुपारी काशी विमानतळावरून थेट हॉटेल गेटवेत पोहोचतील. तेथे नदेसर पॅलेसमध्ये मोदी त्यांचे स्वागत करतील. डिनर टेबलावरच बुलेट ट्रेन, नमामि गंगे व इतर प्रकल्पांवर चर्चा होईल.