आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरांतून साईमूर्ती हटवण्याचा ठरावच नाही; पीआरओ राजेश जोशी यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिलाई/कवर्धा- छत्तीसगडच्या कवर्धा येथील दोनदिवसीय धर्म संसदेत मंदिरांतून साईमूर्ती हटवण्याचा कोणताही प्रस्ताव पारित झालेला नाही. धर्म संसदेचे पीआरओ राजेश जोशी यांनी मंगळवारी हे स्पष्टीकरण दिले.

धर्म संसदेतील निर्णयांविषयी काही लोक निष्कारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जोशी म्हणाले. संसदेतील पारित प्रस्तावानुसार मंदिरांतील मूर्ती हटवण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे जोशी यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यापाठोपाठ छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांनीही सर्वांना आपल्या श्रद्धेनुसार धर्मपालनाची मुभा असल्याचे स्पष्ट केले. मंदिरांतून साईमूर्ती हटवण्यात येणार नाहीत, असेही मंत्र्यांनी सांगितले.
दुसऱ्या लग्नाच्या हक्कावर चर्चा नाही
अपत्यहीन हिंदू पतींना दुसऱ्या लग्नाचा अधिकार देण्यासाठी हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली नसल्याचे जोशी यांनी सांगितले. धर्म संसदेत एकूण ६ प्रस्तावच पारित झाले आहेत.

पारित झालेले सहा ठराव असे....
१. शिर्डीचे साई गुरू, संत वा देवाचे अवतार नाहीत.
२. गोहत्येवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात यावी.
३. गंगेचा प्रवाह निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न व्हावा.
४. शालेय अभ्यासक्रमांत गीता व रामायण शिकवा.
५. रामाच्या जन्मभूमीवर अयोध्येत मंदिर उभारावे.
६. भोंदू साधू-संतांवर बहिष्कार टाकावा.