आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीचे साईबाबा देव नव्हेतच! धर्म संसदेत आज प्रस्ताव पारित होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवर्धा (छत्तीसगड)- साईबाबा देव नाहीत, असे दोनदिवसीय धर्म संसदेच्या पहिल्याच दिवशी १३ आखाडे आणि सर्व शंकराचार्यांनी एकमताने म्हटले आहे. साईबाबांची पूजा केली जावी की नाही, याचा फैसला छत्तीसगड राज्यातील कवर्धा जिल्ह्यात १९व्या धर्म संसदेत सोमवारी सुनावला जाईल. निर्णयाचा अंतिम अधिकार काशी विद्वत पीठाला देण्यात आला आहे. रविवारी १३ आखाडे आणि शंकराचार्यांनी आपापले युक्तिवाद मांडले. साई हे ईश्वर नाहीत; त्यांची पूजा केली जाऊ नये, या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले. ज्योतिष आणि द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद यांनी सर्वात आधी या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच कारणामुळे धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले.

साईंविरुद्ध युक्तिवाद
>सनातन परंपरेत पाच देव- शिव, शक्ती, गणेश, विष्णू, सूर्य व २४ अवतारांचीच पूजा केली जाते. कलियुगात बुद्ध व कल्की या दोनच अवतारांची चर्चा आहे. यात तिसरे साईबाबा कोठून आले?
>साईचरित्रानुसार १९१८मध्ये साईंचे निधन झाले. नश्वर शरीराचा आत्मा कुठे गेला, हे ज्ञात नाही. त्याची पूजा कशी? साई गुरूही नाहीत.

>सनातन परंपरा वेद व शास्त्र मानते. पूजा हिंदू धर्मविधीतच शक्य आहे. साई हिंदू वा मुस्लिम असल्याच्या दोन्ही संकल्पनांना नाकारतात.
१३ आखाड्यांसह सर्व शंकराचार्यांचे एकमत
सनातन धर्माशी जोडू नका
>साई वेदोक्त परंपरेचा भाग नाहीत. रामायण, महाभारतात त्यांच्या कोणत्याही विचारधारेचा उल्लेखही नाही. सनातन परंपरेतील बाबी साईंशी जोडण्यावर आमचा मूळ आक्षेप आहे. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलण्याची लीला भगवान कृष्णाची आहे, असे उदाहरण देता येऊ शकते. मात्र साईभक्त गोवर्धन पर्वत उचलल्यासारखे का वागत आहेत?'
-शिवकुमार शास्त्री, चातुर्मास आयोजन समितीचे प्रमुख