आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यांना वाचवण्यासाठी शिवपाल यांचा बळीचा बकरा, मायावतींची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - समाजवादी पक्षातील कौटुंबिक वाद संपुष्टात आल्यानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘उत्तर प्रदेशमध्ये २०१७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा पराभव अटळ आहे. त्यामुळेच पुत्र अखिलेश यांची प्रतिमा वाचवण्यासाठीच मुलायमसिंह यादव यांनी शिवपाल यांना प्रदेशाध्यक्ष करून त्यांना बळीचा बकरा बनवले आहे,’ अशी टिप्पणी मायावती यांनी रविवारी केली.

सपातील वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात सपाचा पराभव निश्चित आहे. अखिलेश यांची प्रतिमा वाचवण्यासाठी शिवपाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. ‘पुत्रमोहा’ पासून लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी मुलायमसिंह यादव यांची ही सुनियोजित चाल आहे. या संपूर्ण कौटुंबिक नाट्याचा शेवट असा झाला की त्याची पटकथा आधीच लिहिण्यात आली होती, असेच वाटते. अखिलेश यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मुलायम यांनीच हे नाट्य रचले होते. यादरम्यान बिजनौरमध्ये जातीय संघर्ष उद््भवल्यानंतरही त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. गायत्री प्रजापती यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या निर्णयाबद्दल मायावती म्हणाल्या की, खाण विभागातील भ्रष्टाचारामुळे प्रजापती यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आले होते, आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जात आहे. म्हणूनच काहीतरी ‘डील’ झाली आहे.
रामगोपाल यादव यांच्या भाच्याची हकालपट्टी
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद हाती घेताच शिवपाल यादव यांनी रविवारी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांचा भाचा अरविंद यादव यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. एक दिवसांपूर्वीच त्यांनी अखिलेश यांच्या जवळच्या नेत्यांची पदे काढून घेतली होती. सपातील वादात रामगोपाल यादव अखिलेश यांच्यासोबत होते. अरविंद यादव यांच्यावर पक्षप्रमुख मुलायमसिंह यांच्या विरोधात घोषणा देणे, जमिनीवर अवैध ताबा करणे असे आरोप आहेत. ते मैनपुरीतून पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. मैनपुरीतील सपाचे कार्यकर्ता चांदगी राम प्रधान यांचीही पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, शिवपाल यादव कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, पक्षात कुठलीही गटबाजी नको. आधी पक्ष, नंतर नेताजी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जाव्यात. नेताजींनी घेतलेल्या निर्णयाची सर्वांनी अंमलबजावणी करावी.
पुढे वाचा...
काँग्रेसची ‘खाट’ जनतेनेच उभी केली : स्मृती
बातम्या आणखी आहेत...