आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलायमसिंह यांचे धाकटे बंधू शिवपाल यांनी घेतली अखिलेश यांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मुलायमसिंह यांचे धाकटे बंधू शिवपाल यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. त्यामुळे समाजवादी पार्टी व यादव परिवारात सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

उभय नेत्यांमध्ये ९० मिनिटे चर्चा झाली. शिवपाल व अखिलेश यांच्यातील चर्चेमुळे मतभेद दूर झाल्याचे संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकार व संघटना यांच्यातील दरी कमी करण्यासाठी मुलायम यांनी हस्तक्षेप केला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवपाल यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व आले आहे. अखिलेश यांच्यासाेबत मतभेद असल्याचा दावा मात्र शिवपाल यांनी शुक्रवारी बोलताना फेटाळून लावला होता. बुधवारी शिवपाल यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले होते. अखिलेश मुख्यमंत्री आहेत. मी मंत्री आहे. सरकार म्हणून आमची संयुक्त जबाबदारी आहे, याची मला जाणीव आहे. दुसरीकडे २०१७ मध्ये राज्यात सपा पुन्हा सत्ता स्थापन करेल. २०१२ पेक्षा मोठ्या विजयाची नोंद सपा करेल, असा विश्वासही शिवपाल यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...