आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारप्रमाणे UPमध्ये महाआघाडीचा प्रयत्न,शिवपाल यांनी घेतली अजितसिंहांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपाल यादव यांनी रालोदचे प्रमुख अजित सिंह यांची भेट घेतली. - Divya Marathi
शिवपाल यादव यांनी रालोदचे प्रमुख अजित सिंह यांची भेट घेतली.
लखनऊ - समाजवादी पक्षामध्ये सुरु असलेल्या सुंदोपसुंदी दरम्यान, शुक्रवारी शिवपाल यादव यांनी राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) प्रमुख अजित सिंह यांची भेट घेतली. अजित सिंह यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवपाल आणि त्यांचे चिरंजीव आदित्य भेटीसाठी गेले होते. भेटीनंतर शिवपाल म्हणाले, '5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रजत जयंतीचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट होती.' दरम्यान अशीही बातमी आहे, की बंद खोलीत शिवपाल यांनी काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात बातचीत झाली. दोन तासांच्या या बैठकीत आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसंबंधी चर्चा झाली. या भेटीनंतर उत्तर प्रदेशात महाआघाडीची चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, आधी चर्चा थांबली होती, याचा अर्थ असा नाही की पुन्हा शक्यता तपासल्या जाणार नाही.

भाजपला यूपीमध्ये प्रवेशही नाही
- शिवपाल पुढे म्हणाले, 'आम्ही लोहियावादी आणि चरणसिंहवादींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमची इच्छा आहे की यासर्वांनी एकत्र यावे.'
- आम्ही भाजपला यूपीमध्ये प्रवेशही करु देणार नाही.
- यादरम्यान नितीशकुमार म्हणाले, 'यापूर्वी एक पक्ष तयार करण्याच्या हलचाली झाल्या होत्या. तेव्हा तो प्रयत्न पूर्ण झाला नाही. याचा अर्थ असा होत नाही की पुन्हा तशा शक्यता तपासल्या नाही पाहिजे. आज जे विरोधक आहेत, त्यांनी एकजूट झाले पाहिजे. यासंदर्भातील निमंत्रण अजूनपर्यंत माझ्याकडे आलेले नाही.'
अजित सिंह काय म्हणाले...
- 'शिवपालजींनी रजत जयंती सोहळ्यासाठी निमंत्रण दिले. त्याला मी उपस्थित राहाणार आहे.'
- महाआघाडीच्या प्रश्नावर ते म्हणाले, '5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल आमच्यात चर्चा झाली. आमचे राजकारणासोबत कौटुंबीक संबंध आहेत. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, महाआघाडीबद्दल काय आहे शिवपाल यांचे मत..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...