आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shivpal Yadav Resigned From The Uttar Pradesh Cabinet Of Chief Minister Akhilesh Yadav

\'माझ्या हयातीत पक्षात फूट पडणार नाही\', राजीनामा दिलेल्या शिवपाल यांची घेतली बाजू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पक्षात चार दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर शुक्रवारी मुलायमसिंह यादव यांनी स्वत: समोर येऊन सूत्रे हाती घेतली. त्यांनी मुलगा अखिलेश यादव यांच्या निर्णयात बदल करून काका-पुतण्यातील वाद सुटल्याचा दावा केला. अखिलेश, शिवपाल यांनीही मुलायम यांचा निर्णय मान्य करू, असे सांगितले, पण अजूनही संघर्ष संपलेला नाही, असे म्हटले जात आहे. मुलायमसिंह शनिवारी शिवपाल यांच्याबाबत एखादी घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे.

सूत्रांच्या मते, तणाव संपवण्यासाठी मुलायमसिंह यांनी चार सूत्री फॉर्म्युला तयार केला आहे. त्याअंतर्गत शिवपाल यादव हे सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून कायम राहतील. त्यांच्याकडून काढून घेतलेली सर्व खातीही त्यांना परत दिली जातील. चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आलेले गायत्री प्रजापती पुन्हा मंत्री होतील. चौथा मुद्दा म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपात अखिलेश यादव यांची मोठी भूमिका असेल. खासदार अमरसिंह यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुलायम यांनी अखिलेश यांना दिले आहे.

शिवपाल आणि अखिलेश यांच्यासोबत वेगवेगळी बैठक घेतल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुलायमसिंह म्हणाले की, ‘मी असेपर्यंत सपा फुटणार नाही. सर्व ठीक झाले आहे. गायत्री प्रजापती यांना पुन्हा मंत्री केले जाईल तसेच शिवपाल यांना सर्व खाती परत दिली जातील.’ मुलायमसिंह हे मुलापेक्षा भावाला महत्त्व देत असल्याचे दिसेल. शिवपाल समर्थकांच्या घोषणाबाजीदरम्यान मुलायम म्हणाले की, अखिलेश माझे म्हणणे टाळणार नाही, असा मला विश्वास वाटतो. त्यानंतर अखिलेश यादवही म्हणाले की, ‘नेताजी माझे वडील आहेत. त्यांना खुश ठेवणे ही माझी जबाबदारी आहे.’ प्रजापती यांच्याबाबत मुलायमसिंह यांचा
निर्णय स्वीकारू, असेही अखिलेश यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अखिलेश म्हणाले, खुर्ची सोडेन, पण २०१७ ची तिकिटे मीच वाटेन... शिवपाल म्हणाले, तिकीट वाटणार असे कधीही म्हटलेच नव्हत
बातम्या आणखी आहेत...