आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारमध्ये गडबड असू शकते, कुटुंबामध्ये नव्हे : अखिलेश, यूपीत ‘महाभारत’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील सरकारमध्ये गडबड असू शकते. काही मतभेद असू शकतात. परंतु कुटुंबात तसे काहीही नाही, असा दावा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बुधवारी केला. काका-पुतण्याचा वाद चव्हाट्यावर आला असला तरी मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केलेला नाही.
समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या आदेशाचे आपण पालन करतो. काही मुद्द्यावर मी निर्णय घेतला असला तरी त्या पूर्वी ‘नेताजीं’चा सल्ला घेत असतो. तथापि काही निर्णय मी स्वत: घेतले आहेत. अखिलेश यांच्या निवासस्थानी बुधवारी आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. कुटुंबाच्या पातळीवर नेताजी यांच्या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यानुसारच अंमलबजावणी केली जाते. सरकारमध्ये काही समस्या असू शकतात. त्या मान्य करता येतील, असे अखिलेश म्हणाले. मुलायम सिंह यांच्या कुटुंबात मतभेद असल्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अखिलेश यांनी मंगळवारी मुलायम यांचे बंधू शिवपाल सिंह यांचे विश्वासू असलेले मुख्य सचिव दीपक सिंघल यांना पदावरून हटवले आहे. त्यानंतर काका-पुतण्यातील वाद आणखीनच वाढला. त्या अगोदर मुलायम यांनी अखिलेश यांना सपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काढले होते. त्या घटनेच्या केवळ दोन तासांतच अखिलेश यांनी काका शिवपाल सिंह यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेतली होती. त्यावरून वाद शिगेला गेला.
पुढील स्‍लाइडववर वाचा, विधानसभेच्या तोंडावर राज्यातील सत्ताधाऱ्यांत मतभेद वाढले
बातम्या आणखी आहेत...