आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून श्रीनगरच्‍या लाल चौकात तिरंगा फडकावण्‍याचा प्रयत्‍न, 6 शिवसैनिकांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.  शिवसेनेचे कार्यकर्ते दोन वाहनांमधून लाल चौकातील टाॅवरजवळ दाखल झाले. वाहनातून उतरत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरऐवजी लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवून दाखवा, असे आव्हान केंद्र सरकारला मागच्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या जम्मू शाखेने राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विशेष पथक पाठवले होते.


लाल चौकात तिरंगा फडकावण्‍याचे आव्‍हान स्वीकारल्‍याचे सर्वप्रथम जम्‍मू काश्‍मीरचे शिवसेनेचे प्रभारी डिम्‍पी कोहली यांनी जाहीर केले होते. त्‍यानूसार शिवसेनेची एक तुकडी आज श्रीनगरमध्‍ये दाखल झाली होती. हे सर्व शिवसैनिक जम्‍मूचे रहिवासी असल्‍याची माहिती आहे.


पुढील स्‍लाइडवर वाचा, काय म्‍हणाले होते फारुख अब्‍दुल्‍ला?

बातम्या आणखी आहेत...