आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiya Vakf Board Mulayam And Amajm Relation Bitter

शिया वक्फ बोर्डाची निवडणूक रद्द; मुलायम सिंह-आझम खान आमनेसामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यातील मतभेद एका कारणावरून चव्हाट्यावर आले आहेत. मुलायम सिंह यांच्या आदेशावरून राज्य सरकारने शिया वक्फ बोर्डाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. यामुळे आझम खान हे मुलायम सिंह नाराज झाले आहेत.

मुख्यमंत्री अखिलेश यादव याच्या निवासस्तानी उर्दू अकादमीच्या पुरस्काराचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्याक्रमाचे अध्यक्ष आझम खान होते. परंतु नाराज झालेल्या आझम खान यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे सूत्रांनी सांगितले. आझम खान निर्धारित कार्यक्रमाला पोहोचले नाही. आझम खान यांच्यामुळे सकाळी 11 वाजेचा निर्धारित कार्याक्रम दुपारी साडेबारा वाजता सुरु झाला.

आझम खान आणि मौलवी जव्वाद यांच्यात वर्चस्वासाठी लढाई...
शिया वक्फ बोर्डाची निवडणूक ही आझम खान आणि शिया मौलवी कल्बे जव्वाद यांच्यासाठी आता वर्चस्वाची लढाई बनली आहे. शिया वक्फ बोर्डाच्या निवडणुकीसाठी आझम खान यांनी आग्रही भूमिका घेतली असताना कल्बे जव्वाद यांनी या निवडणुकीला विरोध दर्शवला आहे. सोमवारी (4 ऑगस्ट) निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करायचे होते, परंतु ऐनवेळी राज्य सरकारने निवडणूक रद्द करण्‍याचे आदेश जारी केले.
शिया वक्फ बोर्डाची निवडणूक झालीच पाहिजे, यावर आझम खान ठाम आहेत. दुसरीकडे, आझम खान यांना रोखण्यासाठी राज्य सरकारने मौलवी जव्वाद हाताशी घेतले आहे. मुलायम यांच्या सांगण्यावरून जव्वाद यांनी शिया वक्फ बोर्डाच्या निवडणुकीला विरोध केला आहे.

आझम खान यांनी जव्वाद यांचावर साधला निशाणा...
शिया वक्फ बोर्डाच्या निवडणुकीला विरोध करणारे मौलवी कल्बे जव्वाद यांच्यावर आझम खान यांनी खोचक टीका केली आहे. आरएसएसचा प्रचार करणारा इस्लाम धर्माच्या नावावर कलंक होऊ शकतो मात्र धर्मगुरु नाही, अशा शब्दात आझम खान यांनी जव्वाद यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. मौलवी आरएसएस आणि यहूदींचा एजेंट असून धर्माविरोधात जनतेला चिथवणारा हा धर्मगुरु नसून एक ब्लॅकमेलर असल्याचाही आरोप आझम खान यांनी केला आहे.

सीबीआय चौकशीत सत्य बाहेर येईल- आझम खान
आझम खान म्हणाले, कबरची जागा विकणारे कधीही धर्मगुरु होऊ शकत नाहीत. शिया वक्फ बोर्डाच्या निवडणुकीला हे विरोध करत आहे, कारण त्यांच्याकडे एक चतुर्थाअंश सदस्य नाहीत. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) चौकशीत सत्य लवकरच बाहेर येईल, असेही आझम खान यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आझम खान यांनी मुख्यमंत्र्याकडे केली सीबीआय चौकणीची मागणी...

(फाइल फोटो: नगर विकास मंत्री आझम खान आणि मुलायम सिंह यादव)