आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्या रात्री नवरीने केले असे काही की नवरदेव झाला बेशुद्ध, जाग आल्यावर समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरीने डोके चेपून देण्याच्या बहाण्याने नवरदेवाला क्रीम लावली आणि तो बेशुद्ध झाला. - Divya Marathi
नवरीने डोके चेपून देण्याच्या बहाण्याने नवरदेवाला क्रीम लावली आणि तो बेशुद्ध झाला.

आग्रा - मधुचंद्राच्या दिवशी नवरीने नवरदेवाला बेशुद्ध केले आणि घरात ठेवलेल्या किमती ऐवजावर डल्ला मारल्याचा प्रकार घडला आहे. वरपक्षाचा आरोप आहे की, लग्नाच्या वेळी मुलगी बदलण्यात आली होती आणि एका चोर मुलीला नवरी बनवून पाठवण्यात आले होते. जो फोटो दाखवला होता, ती ही मुलगी नव्हती. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

 

रात्री नवरदेवाच्या तोंडाला क्रीम लावून केले बेशुद्ध
- ही घटना आग्राच्या बाह परिसरातील विक्रमपूर गावातील आहे. येथील रहिवासी संजय (36) यांचे लग्न 29 नोव्हेंबर 2017 रोजी मैनपुरीच्या सुनीताशी झाले होते.
- नवरदेवाचा भाऊ ऋषी म्हणाला, 30 नोव्हेंबरला नवरी घरात आली. कुटुंबीयांनी तिचा चेहरा पाहिला तेव्हा सगळे चकित झाले. कारण जिचा फोटो दाखवला होता, ती ही मुलगी नव्हती.
- दुसरीकडे, सासरी येताच ती सारखी फोनवर कुणाशी तरी बोलत होती. तिचे लक्षण तेव्हाच ठीक वाटत नव्हते. हे पाहून संजयने लगेच तिच्या माहेरी फोन केला, परंतु त्यांनी नवरी मुलगी खरी असल्याचे सांगितले.

 

नवरीने क्रीम लावताच नवरदेव झाला बेशुद्ध
- नवरदेवाचा चुलत भाऊ मुकेश म्हणाला- रात्री झोपण्याची वेळ झाली तेव्हा संजयला त्याच्या खोलीत पाठवण्यात आले. यादरम्यान नवरीने संजयला समजावले की, मी तीच मुलगी आहे. माझ्याबाबत उलटसुलट बोलले जात आहे.
- यानंतर तरुणीने संजयला डोके चेपून देण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी तिने संजयच्या तोंडाला कुठलीशी क्रीम लावली. यामुळे काही वेळातच संजय बेशुद्ध झाला. यानंतर तिने घरात ठेवलेले सर्व दागिने आणि किमती ऐवज घेऊन फरार झाली.
- संजयला जेव्हा शुद्ध आली तोपर्यंत ती फरार झालेली होती, दागिनेही गायब होते. यानंतर त्याने कुटुंबीयांना उठवून सर्व हकिगत सांगितली. सकाळी नवरीविरुद्ध पोलिसांत चोरीची तक्रार नोंदवण्यात आली.
- सूत्रांनुसार, नवरदेव वयस्कर होता, यामुळे तो तरुणीला पसंत नव्हता. तथापि, नवरी पळून जाण्याचे कारण काहीही असो, परंतु आता कुटुंबीय तिला लुटेरी दुल्हन म्हणत आहेत.

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- यासंबंधी एसपी ग्रामीण अखिलेश म्हणाले, सध्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. वरपक्षाकडून तक्रार मिळाली आहे. तरुणीच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आहे. तपासानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...