आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयक्रिडेचे नारायण साईला व्‍यसन, एकाच वेळी 9 मुलींसोबत केले तोंड काळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलात्‍काराचे आरोप असलेला आसाराम बापूचा पुत्र नारायण साई याचा कसून शोध घेण्‍यात येत आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडसत्र सुरु आहे. तरीही त्‍याचा शोध लागलेला नाही. त्‍यामुळे सुरत पोलिसांनी न्‍यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. शरणागती न पत्‍कारल्‍यास नारायाण साईची मालमत्ता जप्‍त करण्‍यात येईल. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍याच्‍याविरुद्ध आता फास आवळायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे नारायण साईबाबत आणखी काही खळबळजनक खुलासे झाले आहेत. त्‍यावरुन त्‍याची विकृत मनोवृत्ती समोर येत आहे.

सुरतचे पोलिस आयुक्त राकेश अस्‍थाना यांनी सांगितले. की नारायण साईला शारिरिक संबंधांचे व्‍यसन आहे आणि त्‍याला दररोज संबंध हवे असतात. एका साधकाने या दाव्‍याला दुजोरा दिला आहे. त्‍याने नारायण साईला एकाच वेळी 9 मुलींसोबत प्रणय करताना पाहिले आहे.

पोलिसांनी या साधकाचा कबुलनामा न्‍यायालयात सादर करुन नारायण साईला अटकपूर्व जामीन मंजूर करण्‍यास तीव्र विरोध केला. पोलिसांकडून न्‍यायालयात बराच युक्तीवाद करण्‍यात आला. त्‍यातील काही तथ्‍ये धक्‍कादायक आहेत. साधकाच्‍या कबुलनाम्‍यात उल्‍लेख आहे, की नारायण साई नेहमी सामुहिक दुष्‍कर्म करायचा. त्‍याच्‍या खोलीची स्‍वच्‍छता करण्‍यासाठी पोहोचलो त्‍यावेळी तिथे बिअरच्‍या बाटल्‍याही दिसल्‍या. एकदा तर त्‍याच्‍यासोबत 9 मुली होत्‍या. त्‍याने या मुलींसोबत वासना शमविली.

महिलांच्‍या पतिंना नपुंसक बनवायचा नारायण साई... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये....