आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking ToThe Vote Bank Politics, Caste Wise Rally Prohibited Alhabad High Court

राजकीय पक्षांच्या जातीनिहाय मेळाव्यांवर अलाहाबाद हायकोर्टाची बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - व्होट बँकेच्या राजकारणाला न्यायालयाने जबरदस्त दणका दिला आहे. राजकीय पक्षांच्या जातीनिहाय मेळाव्यांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी बंदी घातली. याआधी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने कलंकित नेत्यांबाबत कठोर निकाल दिला होता. न्यायमूर्ती उमानाथ सिंह आणि महेंद्र दयाल यांच्या पीठाने जातींचे मेळावे घटनाबाह्य असून यामुळे समाजात दुही निर्माण होते हा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरला. सपा, बसप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. शिवाय केंद्र व राज्य सरकारला 4 आठवड्यांत उत्तरही मागितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट निर्वाळा
कोठडी असो किंवा तुरुंगवास, निवडणूक लढवण्यावर बंदीच
पोलिस कोठडी किंवा तुरुंगात असलेली कोणीही व्यक्ती निवडणूक लढवू शकणार नाही, असे सर्वोच्च् न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. न्यायमूर्ती ए.के. पटनायक आणि एस.जे. मुखोपाध्याय यांच्या पीठाने कायद्यातील कलम 4 व 5 चा हवाला देऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. तुरुंगातील लोकांना निवडणूक बंदी घालण्याच्या हायकोर्टाच्या निकालावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी आव्हान याचिका दाखल केली होती.

पळवाट काढूच
५. निवडणूक काळात जातीवर जाहीरपणे मते न मागता नवा गुप्त मार्ग शोधतील.
2. जातीय मेळावे सामाजिक संस्था घेतील. नेते फक्त पाहुणे बनून जातील.
3. कोर्टाचा अवमान टाळण्यासाठी विशिष्ट जातींवर जाहीर चर्चा, मतदान मात्र गुप्त.
अडचण छोट्या पक्षांची
५. उत्तर प्रदेशात सपा, बसपची मोठी अडचण; कारण यांची व्होट बँकच जातीवर आधारित.
2. निकाल यूपीपुरता असला तरी देशव्यापी ठरू शकतो. इतर न्यायालये संदर्भ घेतील.
3. निवडणुका तोंडावर असल्याने जाती-पातीचे गणित चुकेल. नवे मार्ग शोधावे लागतील.

आनंद बड्या पक्षांमध्ये
या निकालांमुळे बडे पक्ष खुश. जातीय मेळाव्यांवर बंदी, 2 वर्षे शिक्षा झाली तर आमदार-खासदारकी रद्द. हे निकाल व निवडणूक सुधारणांचे प्रयत्न प्रादेशिक पक्षांचा प्रभाव रोखू शकतात. लोकसभेच्या 300 जागी जातीय समीकरणांमुळेच प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व.

जातीविना राजकारण कसले...?
बसप प्रमुख मायावती म्हणतात,
ज्या जातींचे मतदार जास्त, त्यांना तेवढ्या जादा जागा मिळतील.
भाजप बिहारमध्ये मागास, तर यूपीत हिंदू मतांवर मदार. मतांचे ध्रुवीकरण हाच पक्षाचा मुख्य आधार.
काँग्रेस उत्तर प्रदेशात जातीविना राजकारणाचा विचारही करता येत नाही.
इति राहुल गांधी
सपाचे मुलायमसिंह मुस्लिम-यादव मतांवर पीएम होऊ इच्छितात. यासाठी लांगुलचालन सुरू आहे.