आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणी चढली टॉवरवर; प्रियकराला म्‍हणाली, हो म्‍हण, नाही तर उडी मारेन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरायकेला - प्रियकराने आपल्‍यासोबत लग्‍न करावे, यासाठी एका तरुणीने वीज पुरवठ्याच्‍या हायटेंशन टॉवरवर चढून 'शोले' आंदोलन केले. विशेष म्‍हणजे तिच्‍या प्रियकरानेही तिला लग्‍नास होकार दिला. हा प्रकार झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्‍ह्यातील जोरडीह गावात रविवारी दुपारी घडला.
प्रियकाराने काय म्‍हटले...
> प्रियकराने आपल्‍यासोबतच लग्‍न करावे, या मागणीसाठी एक तरुणी विजेच्‍या 100 फूट उंच टॉवरवर चढली.
> ती माणिक बाजार गावातील रहिवासी आहे असून, काही दिवसांपासून तिचे विजय महतो नावाच्‍या युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. मात्र, विजयने लग्‍नास नकार दिला होता.
> त्‍यामुळे त्‍याचा होकार मिळवण्‍यासाठी ती तरुणी टॉवरवर चढली आणि तिने उडी मारून जीव देण्‍याची धमकी दिली.
> हा प्रकार परिसरातील नागरिकांच्‍या लक्षात येताच त्‍यांनी घटनास्‍थळावर गर्दी केली.
हट्टावर अडून बसली तरुणी...
> खाली उतर, असे ग्रामस्‍थ तिला ओरडून सांगत होते. दरम्‍यान, घटनास्‍थळावर पोलिसही आले.
> पोलिसांनीही तिला उतरण्‍याचे सांगितले. परंतु, तिने आपल्‍या प्रियकराचा नंबर डायल करून फोन खाली फेकला आणि त्‍याला येथे बोलून घेऊन लग्‍नास होकार मिळून द्या, तरच खाली उतरेल, असा पवित्रा घेतला.
> पोलिसांनी विजयला कॉल करून बोलावून घेतले.
> त्‍यानेही लग्‍नास होकार दिला.
> त्‍यानंतर सायंकाळी 6.30 वाजता ती तरुणी खाली उतरली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्‍थळावरचे फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)