आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shooting: \'बाजीराव मस्तानी’चे रॉयल शूट, आमेर महालात थाटली राजसभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - आमेर महालात रविवारी 'बाजीराव मस्तानी’ ची शुटिंग झाली. यावेळी महालात बाजीराव की जय हो... च्या घोषणांची गर्जना झाली. महाराज बाजीराव पेशवे महालात येताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंज झळकत होता. त्यानंतर राजाने दीवान-ए-आम मध्ये थाटलेल्या आम सभेत फर्मान सुनावले. संजय लीला भंसाळी यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटात मुख्य भुमिकेत असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण मात्र रविवारी आमेर महालात पोहोचली नाही. चित्रपटातील इतर कलाकारही सैनिकाच्या पोशाखात शुटिंग करताना आढळून आले.

फोटो - शुटिंगदरम्यान हत्तीवर बसून आत येणारे कलाकार.

शूटिंग पाहण्यासाठी गर्दी
आमेर महल आणि जवळपासच्या परिसरात आलेले पर्यटक मोठ्या संख्येने चित्रपटाचे शुटिंग पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी होम गार्ड्सना चांगलीच परेशानी झाली. यावेळी काही लोकांचे होम गार्ड्सबरोबर वादही झाले.
पर्यटकांना त्रास
शूटिंगदरम्यान पर्यटकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेले. शुटिंगदरम्याने त्यांना सूरजपोल गेट आणि चांदपोल गेटवरच अडवण्यात आले. त्यामुळे पर्यंटकांमध्ये संताप निर्माण झाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शुटिंगचे PHOTO