आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकची चूक दाखवली, विद्यार्थ्याला लाखाचे बक्षीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुरू - राजस्थानातील चुरू येथील एक विद्यार्थ्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटमध्ये चूक दाखवून दिली . ही चूक मान्य करत फेसबुक सुरक्षा केंद्राने ती तातडीने दुरुस्त तर केलीच. त्या सोबतच त्या तरुणाला १५०० डॉलरचा (जवळपास १ लाख रुपये) पुरस्कारही जाहीर केला आहे.

कृष्णकुमार सिहाग असे या तरुणाचे नाव असून तो रतनगढ तालुक्यातील मोलीसर बडा गावातील रहिवासी आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी २३ जून रोजी फेसबुकच्या सुरक्षा केंद्राला एक संदेश पाठवला होता. अँड्रॉइड फोनमध्ये फेसबुक अकाउंट लॉगआऊट केल्यानंतर पुन्हा कोणत्याही पासवर्डशिवाय फेसबुकच्या लाइट ब्राऊजरमध्ये पुन्हा ओपन करता येऊ शकते, असे त्याने तक्रारीत म्हटले होते. त्यासाठी त्याने स्क्रीन शॉट व २८ जून रोजी व्हिडिओ पाठवले.

इंटरनेटवर शोधली चूक
कृष्णकुमारने सांगितले की त्याने २०१४ मध्ये अँड्रॉइड मोबाइल घेतला होता. तेव्हापासून तो इंटरनेट वापरत असताना फेसबुकही वापरत असे. या काळात अनेकदा मोबाइलमध्ये लॉगआऊट केलेले असतानाही पुन्हा पासवर्ड न देता फेसबुक अकाउंट सुरू होत असे. यामुळे त्रस्त झालेल्या कृष्णकुमारने ही चूक फेसबुकच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...