आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या वादावर माझ्याकडे तोडगा नाही, मी फक्त चर्चेसाठी अालो आहे: श्रीश्री रविशंकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या- अयोध्या वादावर तोडगा काढण्याचा आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही, आपण फक्त चर्चेतून वाद मिटवू पाहणाऱ्या लोकांना व्यासपीठ देण्यासाठी आलो असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी गुरुवारी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना श्रीश्रींनी सांगितले, मी अयोध्या वादात समझोत्यासाठी खटल्यातील पक्षकारांसोबतच अयोध्येत सामान्य व खास लोकांचीही भेट घेणार आहे. तत्पूर्वी त्यांनी श्रीरामजन्म भूमी न्यासचे अध्यक्ष नृत्य गोपालदास यांचीही भेट घेतली. श्रीश्री म्हणाले, या प्रकरणात शांततापूर्ण तोडगा निघावा, अशी माझी इच्छा आहे.  

 

प्रचाराचा खटाटोप : अन्सारी
चर्चेने तोडगा निघणे आता अशक्य आहे. प्रकरण फार पुढे गेले आहे. चर्चेसाठी येणारे लोक तोडग्यासाठी नव्हे तर निवडणूक प्रचारासाठी येतात. त्यांना इथल्या लोकांनी चांगलेच ओळखले आहे. ते त्यांच्या प्रचाराला फसणार नाही. 
- इक्बाल अन्सारी, अयोध्या वादातील पक्षकार

 

अयोध्या वादात कोण-कोणते पक्ष?
- निर्मोही अखाडा, रामलल्ला विराजमान, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड असे तीन पक्ष आहेत. 

 

तिन्ही पक्षांचे दावे...
- निर्मोही अखाड़ा : गर्भगृहात विराजमान रामल्लाची पूजा आणि व्यवस्थापन निर्मोही अखाडा सुरुवातीपासूनच करत आहे. त्यामुळे, ही जागा आम्हाला सुपूर्द करावी.
- रामलल्ला विराजमान : रामलल्ला विराजमान पक्षानुसार ते रामलल्लाचे सर्वात जवळचे मित्र आहेत. या ठिकाणी भगवान राम बाल्यावस्थेत आहेत. त्यामुळे, त्यांची सेवा करण्याची जबाबदारी रामल्ला विराजमान पक्षाला द्यावी. 
- सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड : सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डने केलेल्या दाव्यानुसार, तेथे बाबरी मशीद होती. मुस्लिम तेथे नमाज अदा करत आहेत. त्यामुळे, ती जागा मशीदीला सुपूर्द करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...