आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान, विराटसोबत दिसणाऱ्या या महिलेचा संशयास्पद मृत्यू, गूढ अजुनही कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुभांगना सलमान, विराटसोबत... (फाइल) - Divya Marathi
शुभांगना सलमान, विराटसोबत... (फाइल)
जयपूर - राजस्थानच्या लोकप्रीय उद्योजकाची मुलगी आणि फॅशन डिझायनर शुभांगना हिचा मृतदेह तिच्या जयपूर येथील घरात संशयास्पदरीत्या सापडला आहे. प्राथमिक तपासात तिने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. या फॅशन डिझायनरचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये समाविष्ट आहे. सलमान खान आणि विराट कोहली यांची ती चांगली मैत्रीण होती. हे दोघेही तिच्या निमंत्रणावर राजस्थानला आले होते. शुभांगना राज फॅशन डिझायनर होती. यासोबतच ती जसोदा देवी कॉलेजेस अॅन्ड इन्स्टिट्युशन्सची चेअरपर्सन होती. 
 

- राजस्थानच्या प्रतिष्ठित दीपशिखा शिक्षण समूहाचे मालक प्रेम सुराना यांची ती मुलगी आहे. शुभांगनाच्या पतीने सांगितल्याप्रमाणे, ती कित्येक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. 
- शुभांगना राजने सी-स्कीम येथील गोखले मार्गावर असलेल्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या दिवशी पती घरात नव्हता. तो रात्रभर दुसऱ्या ठिकाणी थांबला होता. त्या दिवशीच पत्नीने आत्महत्या केली आहे. 
- शुभांगना शुक्रवारी रात्री आपल्या मुलासोबत डिनर करून झोपण्यासाठी बेडरूमला निघून गेली. 
- शुभांगनाने शनिवारी उशीरापर्यंत दारच उघडला नाही. तेव्हा मिहीर आणि नोकरांनी बेडरूमचे दार उघडले. आतील दृश्य पाहून मुलगा जागेवर कोसळला.
- त्याची आई फासावर लटकली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बेडरूम सील केले. तसेच कुटुंबियांच्या उपस्थितीत सोमवारी बेडरूमचा तपास करण्यात आला.
- तिच्या शरीरावर कथितरीत्या गळा आवळण्याच्या खुना सापडल्या आहेत. तसेच मरण्यापूर्वी तिने पतीला फोन केला होता, यावरून ही आत्महत्या नसून खुनाचे प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.
 

मुलाने वडिलांना फोन करून दिली माहिती
- शुभांगनाचा पती राजकुमार सावलानीने दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी रात्री मी सीतापुरा येथील कॉलेजमध्येच थांबलो होतो. त्यानंतर शनिवारी सकाळी माझ्या मुलाने फोन करून मला शुभांगनाबद्दलची माहिती कळवली. 
- घटना की सूचना उन्हें शनिवार सुबह बेटे ने फोन पर दी थी। राजकुमार ने बताया कि शुभांगना कई दिनों से डिप्रेशनमध्ये होती. ती आपल्या कामकाजावरून चिंतीत असावी अशी शक्यता पतीने वर्तवली आहे.
बातम्या आणखी आहेत...