आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shweta Menon Withdraws Complaint Against Congress MP

खासदाराविरुद्ध विनयभंगाची तक्रार श्‍वेता मेननने घेतली मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉंग्रेसच्‍या खासदारावर विनयभंगाचा आरोप करणारी अभिनेत्री श्‍वेता मेनन हिने तक्रार मागे घेतली आहे. श्‍वेता मेननने खासदार एन. पीतांबर कुरुप यांच्‍याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात श्‍वेताने माहिती देताना सांगितले, की खासदार कुरूप यांनी माफी मागितल्‍यानंतर मी त्‍यांना माफ केले आणि तक्रार मागे घेतली.

श्‍वेताने सांगितले, की पीतांबर कुरुप यांनी माफी मागितली. त्‍यानंतर मी वडिल, पति आणि गुरुंसोबत याबाबत चर्चा केली. त्‍यांच्‍या सल्‍ल्‍यानंतर मी कुरुप यांना माफी दिली आणि तक्रार मागे घेतली.