आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धरामय्या बनले कर्नाटकचे सीएम; राज्‍यपाल भारद्वाजांनी दिली शपथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी सोमवारी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी सिद्धरामय्या यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे 22 वे मुख्यमंत्री बनले आहेत.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाचा हा शपथ विधी परंपरेनुसार राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये झाला नाही. बंगळुरूतील कांतीवीरा स्टेडियमवर मोठ्या दिमाखदारात झाला. ग्लास हाऊसमधील सुरक्षेच्या कारणावरून तसेच अनेक लोकांना या कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून शपथविधीचा कार्यक्रम कांतीवीरा स्टेडीअमवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळात डी. के. शिवकुमार, आर. व्ही. देशपांडे, शमनौर शिवशंकरप्पा आणि टी. बी. जयचंद्र यांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. मात्र, पक्षातील सर्वांना सांभाळून घेत मंत्रिमंडळ स्थापण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.