आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोस्टाच्या कर्मचाऱ्याच्या घरातून 45 लाख जप्त; उद्योगकांचा ब्लॅकमनी करत होता व्हाइट!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद- झारखंडच्या दुमका येथून पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याच्या घरातून 45 लाख रुपये जप्त करण्यात आले. सर्व नोटा 100-५० च्या होत्या. एलआयसी कॉलनीत राहणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या सिस्टिम ऑपरेटर विनय कुमारवर मागच्या दाराने काळा पैसा बदलण्याचा आरोप आहे.

एसपी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी दोन व्यवसायी गिलानपाडा येथील शिबू पटवारी सुनील पटवारी यांच्या घरावर धाड टाकली. शिबूकडे 16 लाख 50 हजार आणि सुनीलकडे 31 लाख 50 हजार रोख सापडली. 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये ही रक्कम आहे. पोलिसांनी 93 लाख जप्त करून आयकर विभागाला याची सूचना दिली आहे.
दुसरीकडे, नवी दिल्लीत 87 वर्षीय ज्येष्ठाला एका बॅंकेच्या शाखेने 2000 रुपयांच्या नोटेची फोटोकॉपी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 87 वर्षीय ज्येष्ठाचा आरोप-बँकेने 2000 रुपयांच्या नोटेची फोटोकॉपी दिली...
बातम्या आणखी आहेत...