आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धू उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार नाहीत : कॅप्टन अमरिंदर सिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आणि सीएमपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, ते सिद्धूला पसंत करतात. पण कधी आपण त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा दावा केला नाही. यानंतर ते हेदेखील म्हणाले की, काँग्रेसची केंद्रीय समितीच सिद्धूंना डेप्युटी सीएम बनवेल तर त्यांना कोणतीही हरकत नसेल.
  
नेहमीच काँग्रेसविरुद्ध टोकदार विधाने करणारे सिद्धू यांना पक्षात आणण्याच्या प्रश्नावर कॅप्टन म्हणाले की, भाजपत त्यांची परिस्थिती खूपच वाईट झाली होती. ते पुढे म्हणाले की, ते सिद्धूंना बालपणापासून ओळखतात आणि त्यांना खूपच पसंतही करतात.  माजी कसोटी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू ९ जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. ते आपली पत्नी डॉ. नवज्योत कौर यांच्या जागी सिद्धू अमृतसर पूर्व विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवतील. 
बातम्या आणखी आहेत...