आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचा JA, इंडियाचा I, अॅबे म्हणाले-JAI इंडिया; शिखर बैठकीत पंधरा करारांवर स्वाक्षरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद/ गांधीनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानी पीएम शिंजो अॅबे यांनी गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली. हाय स्पीड रेल्वेमार्गाच्या प्रशिक्षण संस्थेच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांनी केले. अॅबे यांनी जपान व इंडियातील अक्षरे जोडून ‘जय जपान, जय इंडिया’ घोषणा दिली. पत्रकार परिषदेत अॅबे यांनी मुंबई व पठाणकोट हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाककडे केली. तसेच चीनचे नाव न घेता ‘मनमानी करू नका’ असा इशाराही दिला.  दोन्ही देशांत १५ करार झाले.
 
बुलेट ट्रेनसाठीच्या कर्जातील सत्य - जपानमध्ये १०० रु. जमा केल्यावर बँकेला १० पैसे द्यावे लागतात, भारताला ०.१% दराने कर्ज दिल्याने २० पैसे अधिक कमाई होईल. 
 
मोदींचा दावा अॅबेंसारख्या मित्रामुळे ८८ हजार कोटी रुपये केवळ ०.१% व्याजदराने मिळाले
वास्तव : जपानमध्ये व्याजदर निगेटिव्हमध्ये उणे ०.१%. म्हणजे बँकेला सेंट्रल बँकेत पैसे ठेवण्यासाठी ०.१% व्याज द्यावे लागेल. भारताला दिलेल्या कर्जावर ०.१% व्याज मिळेल. म्हणजे सेंट्रल बँकेत १०० रुपयांवर बँकेला १० पैसे द्यावे लागतात. भारताकडून १० पैसे मिळतील. २० पैसे फायदा. 
- जपानने फिलिपाइन्सला दोन वर्षांपूर्वी १३ हजार कोटी व या वर्षी ५५ हजार कोटी देण्याचा करार केला. व्याजदर ०.१%. मुदत ५० वर्षे.
 
सरकारचा खुलासा भारताला हा प्रकल्प मोफतच मिळाला. वर तंत्रज्ञानही...
वास्तव : ८८ हजार कोटी रुपये जपान देईल. त्यातील बहुतांश हिस्सा जपानी कंपन्यांनाच मिळणार आहे. महत्त्वाचे काम आणि साहित्याचा पुरवठा कावासाकी, हिताची आणि ईस्ट जपान रेल्वे करेल. याशिवाय तंत्रज्ञान देण्याचा मोबदलाही मिळेल. ती कमाई वेगळी.
- जपानचा २०१०पासून अमेरिकेला बुलेट ट्रेन देण्याचा प्रयत्न. मात्र, यश नाही. त्यांना आतापर्यंत फक्त तैवानमध्ये हा प्रकल्प मिळाला. 
 
अॅबेंचा युक्तिवाद मोदींच्या न्यू इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत
वास्तव : जूनमध्ये जपानमधील बँकांत ६१५ लाख कोटी पडून. ही रक्कम भारताच्या जीडीपीपेक्षा चौपट. मागणी इतकी कमी आहे की कंपन्या नवी गुंतवणूक करू शकत नाहीत. कर्जमागणी केवळ ३% आहे. विकास दर वाढवण्यासाठी व्याजदर कमी. होमलोनही १-१.२५% व्याजदराने मिळते.
- जपानचा जीडीपी वाढीचा दर १.५ % आहे. बँक लोकांनाही ०.३% व्याज देते. डेन्मार्क, स्वीडनसह युरोपातही व्याजदर निगेटिव्ह आहे.
 
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किमी लांबीचा आहे. १.०८ लाख कोटी खर्च होईल. ५ वर्षांत म्हणजे २०२२मध्ये तो तयार करण्याचे लक्ष्य आहे.
- ज्या वर्षी भारतात बुलेट ट्रेन चालेल त्या वर्षी जपानमध्ये या ट्रेनला ६० 
वर्षे पूर्ण होतील. सध्या जगात केवळ १५ देशांत बुलेट ट्रेन आहेत.
 
3 महत्त्वाचे करार
1 खुल्या आकाशाचे धोरण -  भारत-जपानच्या विमान कंपन्या प्रमुख शहरांत अमर्याद उड्डाणांचे संचालन करू शकतील. आतापर्यंत दोन्ही देशांना आठवड्यात २१-२१ उड्डाणांना परवानगी होती.
 
2 ईशान्येचा विकास- भारत जपान अॅक्ट ईस्ट फोरम स्थापन होईल. रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्यावर काम.गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूत जपानी औद्योगिक टाऊनशिप होईल.
 
3 विज्ञान व तंत्रज्ञान- तीन करार. युवा शास्त्रज्ञांना पुढे आणण्यासाठी  एक्स्चेंज प्रोग्राम सुरू होईल.संयुक्त संशोधनाला चालना दिली जाईल. वातावरण बदलावर एकत्र काम करणार.
 
 मात्र यात निराशा: जपानसोबत या  वेळीही यूएस- २ सागरी देखरेख विमानाचा करार होऊ शकला नाही.साधारण ७ वर्षांपासून यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही पंतप्रधानांनी यावर  पुढे वाटाघाटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...