आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर प्रकरण: एकाच प्रकारच्या बुलेट्सने तिघांचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एम.एम.कलबुर्गी यांना धारवाड येथे राहात्या घरी गोळ्या मारण्यात आल्या होत्या. - Divya Marathi
एम.एम.कलबुर्गी यांना धारवाड येथे राहात्या घरी गोळ्या मारण्यात आल्या होत्या.
बंगळुरु - एम.एम. कलबुर्गी, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात फॉरेन्सिक एक्सपर्ट्सनी खळबळजनक खुलासा केला आहे. तिन्ही घटनांमध्ये एकाच प्रकारचे बुलेट कार्ट्रेज (गोळीचे खोके) मिळाले होते. तिन्ही ठिकाणी सापडलेले बुलेट कार्ट्रेज, गोळी 7.65 एमएम पिस्टलमधून झाडाली गेल्याकडे इशार करत आहे. तिन्ही हत्यांमध्ये आरोपी एकाच ग्रुपचे असण्याची शक्यता आहे.

न्यायवैद्यक चाचणीत काय सापडले
- 69 वर्षिय डॉ. दाभोलकर यांना 7.65 एमएमच्या देशांतर्गत बनावटीच्या पिस्टलमधून 4 गोळ्या मारण्यात आल्या होत्या.
- 81 वर्षिय कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर देखिल 7.65 एमएमच्या दोन पिस्टलनी 5 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हल्ल्यात पानसरे ठार झाले तर उमा बचावल्या आहेत. दोन्ही आरोपी बाइकवर आले होते.
- एम.एम. कलबुर्गी यांच्यावरही 7.65 एमएमच्या पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

याची देखिल शक्यता
- तिन्ही हत्यांमध्ये दोन शस्त्रांचा वापर होण्याची देखिल शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पोलिस काय म्हणतात
- कर्नाटक पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले, की कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर प्रकरणात घटनास्थळी सापडलेले कार्ट्रेजमध्ये बरेच साम्य आढळून आले आहे.
- तिन्ही घटनास्थळांवर सापडलेल्या कार्ट्रेजमध्ये साम्य असले तरी तो पुरेसा पुरावा ठरु शकत नाही.
- कर्नाटकचे पोलिस महासंचालक एच.सी.किशोरचंद्र म्हणाले, 'कलबुर्गी हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत मी काहीही सांगू शकत नाही.'

आणखी काही तर्क
- सूत्रांच्या माहितीनुसार, कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्येनंतर घटनास्थळी सापडलेल्या कार्ट्रेजमध्ये समानता आहे. पानसरे यांच्या हत्येनंतर सापडलेल्या कार्ट्रेजचे दोन सेट आणि दाभोलकरांच्या हत्येनंतर तिथे सापडलेल्या कार्ट्रेजमध्येही समानता आढळून आली आहे. मात्र, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्याजवळ सापडलेले कार्ट्रेज सारखे दिसत नाही.
काय म्हणाले कर्नाटकचे गृहमंत्री
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, आम्हाला काही ठोस पुरावे मिळाले आहे, त्यावरुन तिन्ही हत्यांमध्ये परस्पर संबंध असल्याचे सिद्ध करता येईल.

कोण आहेत कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर
- एम.एम.कलबुर्गी हे कन्नड विद्यापीठाचे माजी कुलगुरु होते. ते बुद्धीवादी लेखक होते.
- गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील डाव्या चळवळीतील आघाडीचे नेते होते. त्यांचे 'शिवाजी कोण होता ?' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
- नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रतील अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यांच्या हत्येनंतर राज्यात हा कायदा लागू झाला.

कोणाची हत्या कधी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील पुलावर झाली होती.
- सीपीएम नेते कॉम्रेड गोविंद पानसरे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना 20 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे दाम्पत्याला नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार झाला होता.
- डॉ. एम.एम. कलबुर्गी यांना धारवाड येथील त्यांच्या राहात्या घरी 30 ऑगस्ट 2015 रोजी गोळ्या मारण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाइडमध्ये, पानसरे आणि दाभोलकर
बातम्या आणखी आहेत...