अमृतसर (पंजाब) - अनुराग कश्यप दिग्दर्शित 'उडता पंजाब'चा वाद अजून संपलाही नाही तर आणखी एका चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे. साजित नाडियादवालाची अपकमिंग फिल्म 'ढिशूम'च्या एका सीनमध्ये 'सीरी साहिब' (किरपान) चुकीच्या पद्धतीने सादर केल्या प्रकरणी शीख समुदायाने आक्षेप घेतला आहे. 'सीरी साहिब' हे शीख धर्मियांसाठी पवित्र चिन्ह मानले जाते. त्याच्या चुकीच्या सादरीकरणावरुन शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक यांनी आक्षेप घेतला आहे.
केव्हा प्रदर्शित होणार चित्रपट..
- शीख धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारा तो सीन असल्याचे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक यांनी म्हटले आहे. या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाने दखल देण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
- हा चित्रपट 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यात जॉन अब्राहम, वरुण धवन, अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.
एका सीनवर ऑब्जेक्शन, लिहिले सेन्सॉरला पत्र
- ढिशुमच्या 'इश्क का मर्ज' या गाण्यात अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिसच्या कमरेला शीखांचे पवित्र चिन्ह सीरी साहिब लटकलेले दिसते. त्यामुळे वाद उद्भवला आहे.
- जॅकलिन टॉप आणि शॉर्टमध्ये या गाण्यावर थिरकत असते आणि तिच्या कमरेला किरपान बांधलेली आहे. चुकीच्या ठिकाणी या पवित्र चिन्हाचा स्पर्ष होत आहे.
- दिल्ली कमिटीचे सेक्रेटरी मनजिंदर सिंग सिरसा यांनी सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र पाठवून शीख धर्मियांच्या भावना दुखावणारा हा सीन काढून टाकण्याची मागणी केली आहे.
- शिरोमणीचे प्रमुख जत्थेदार अवतारसिंग यांनी याबाबत सेन्सॉर बोर्डाशी संपर्क करुन तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण कोण आहे या चित्रपटात...