आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई करत होती मुलाच्या लग्नाची तयारी, समोर आला तिरंग्यात लपटलेला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानसा - शहीद मनजिंदर सिंग (22) यांचा मृतदेह घेऊन आलेल्या सैनिकांना पाहून गावकरी तसेच अंत्ययात्रेत सहभागी लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दहशतवाद्यांशी भिडताना काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याच्या नवबग गुंढ गावात मंगळवारी मनजिंदर सिंग शहीद झाले.

 

जवानांनी दिली सलामी...
- शहीद जवान मनजिंदर सिंग मिलिटरीत जून 2015 मध्ये 10 शीख रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. 22 डिसेंबरला ते एका महिन्याच्या सुटीवर गावी येणार होते.
- आपल्या शहीद मुलाला सलामी देताना वडील बेशुद्ध झाले.
- गावात अंत्यसंस्काराच्या वेळी लष्कराच्या जवानांनी शहीद मनजिंदरसिंग यांना सलामी दिली.
- शहीद जवानाची आई म्हणाली की, "शगना तो पहलां ही पुत्रा वे मां दी उम्मीदां नू साथ ले गया." (लग्नाच्या आधी माझ्या मुलाने आईची अपेक्षा भंग केली.)

 

राष्ट्रीय खेळाडू होता मनजिंदर
- शहीद मनजिंदर कबड्डी व कुस्तीचे नॅशनल लेव्हलचे खेळाडू होते. नॅशनल स्टाइल कबड्डीत त्यांनी 2013 मध्ये गोल्डमेडल मिळवले होते.
- अंत्ययात्रेत आलेले डेप्युटी कमिश्नर धर्मपाल गुप्ता, एसएसपी परमबीरसिंग परमार, आमदार नाजर सिंह मानशाहिया आणि लेफ्टनंट कर्नल शीख रेजिमेंट संदीप कोतवाल म्हणाले की, देशाच्या रक्षण करताना शहीद झालेला जवान देशाचा गौरव आहे.
- ते म्हणाले की, यांच्यामुळेच आम्ही लोक सुखाने झोपू शकतो. शहीद जवानाच्या कुटुंबाला जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...