आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखी प्रथा : अंत्यसंस्कारासाठी चांदीची तिरडी अत्यावश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिवानी मंडी - एक लाख खर्चून तयार केलेल्या चांदीच्या तिरडीवर आशादेवींचा मृतदेह स्मशानात नेण्यात आला. नातेवाईक डीजेच्या तालावर नाचतच स्मशानापर्यंत पोहोचले. मृतदेह त्या चांदीच्या तिरडीसह सरणावर ठेवण्यात आला. चिता पेटली आणि मृतदेहासह एक लाखाची तिरडीही भस्मसात झाली.

हरियाणाच्या भिवानी येथील बडवा गावाबाहेर राहणार्‍या गाडी लोहार समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार त्यांच्या मुलांना हा विधी पूर्ण करावा लागला. विशेष म्हणजे आशादेवींच्या मुलांना आता 12 दिवस समाजबांधवांना भोजन द्यावे लागणार आहे. कारण ही अट मान्य केल्यानंतरच समाजबांधवांनी मृतदेह तिरडीवर ठेवण्यास होकार दिला होता. हाही त्यांच्या परंपरेचा एक भाग आहे.

विशेष म्हणजे ही प्रथा पाहून त्या गावातील लोकही बुचकळ्यात पडले होते. कारण या प्रथेसाठी त्या समाजातील लोकांनी तब्बल 4 दिवस मृतदेह तसाच ठेवला होता. गावाच्या सरपंचालाही चांदीच्या तिरडीमध्ये झालेल्या अंत्यसंस्कारानंतर ही गोष्ट समजली. ही प्रथा पूर्ण केल्यानंतर गाडी लोहार समाजातील लोक आनंदी दिसत होते हेही विशेष.

चौथ्या दिवशी अंत्यसंस्कार : 6 ऑगस्ट रोजी आशादेवींचे (80) निधन झाले. त्यानंतर समाजबांधव जमले. प्रथेमुसार आशादेवींच्या मुलाला चांदीची तिरडी व समाजबांधवांना 12 दिवसांचे भोजन देण्याचे वचन द्यायचे होते. त्यानंतर त्याला मृतदेह नेण्याची परवानगी मिळणार होती. भोजन देण्याचे लगेच मान्य केले. पण तिरडीसाठी वेळ लागत होता. मृत्यूची बातमी त्याने नातेवाइकांना दिली. त्यानंतर चांदी व पैसे जमल्यानंतर तिरडीचे काम सुरू झाले. त्यासाठी चार दिवस लागले.