आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सिमला-कुलू-मनालीत ‘व्हाइट संडे!’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला -नाताळच्या तोंडावर हिमाचल आणि श्रीनगरवासीयांना हिमवृष्टीची भेट मिळाली आहे. सिमला, कुलू-मनालीसह रोहतांग, लाहौलस्पिती आणि किन्नोर या सर्व घाटावरील भागांमध्ये रविवारी जोरदार हिमपात झाला. रविवारी सायंकाळपर्यंत रोहतांग,राहनीनाला आणि सोलंग या ठिकाणी तीन फूट बर्फवृष्टी झाली होती. संपूर्ण हिमालयात थंडीची लाट आली आहे.
बर्फवृष्टीमुळे वाहतूक कोलमडली आहे.70 रस्ते बंद झाले असून 200 पेक्षाअधिक गाड्या रस्त्यातच अडकल्या आहेत. सिमल्यात शनिवारी रात्रीपासूनच बर्फ पडण्यास सुरुवात झाली. रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस व बर्फर्ही पडत होता.सायंकाळपर्यंत सिमल्यात बर्फाचा पाच इंच जाडीचा थर झाला होता.शनिवारी हिमवृष्टीचे वृत्त कळताच पर्यटकांनी सिमला गाठले.रविवारी सुमारे तीन हजार पर्यटकांनी परिसर गजबजून गेला. सिमल्यात तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले आहे. तर मनालीत उणे 1.2 आणि कलांग येथे उणे 4 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरला आहे. मान्सून अद्याप सक्रिय आहे त्यामुळे बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याचे संचालक डॉ.मनमोहनसिंह यांनी सांगितले.
जवाहर भुयारी मार्ग बंद
श्रीनगर । काश्मीर खोर्‍यात शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे पुन्हा बर्फवृष्टी झाली. पर्यटनाची ठिकाणे असलेली गुलमर्ग,पहलगाम,सोनमर्ग,अमरनाथ गुफा,पीरपंजाल रेंज,किश्तवाड,डोडा जिल्ह्यासह डोंगराळ भागावर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली आहे. जवाहर भुयारी मार्गावर 13 सेंटिमीटर बर्फ पडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
काश्मीरकडे जाणारी वाहने रोखली
काश्मीरकडे निघालेली वाहने सांबा गावानजीक रोखण्यात आली. श्रीनगरात उणे 0.3 डिग्रीपर्यंत नोंदवले गेले. तर लेह भागात उणे 6.2 तापमान आहे. वैष्णोदेवीच्या त्रिकुटा डोंगररांगा आणि माता भवननजीकही बर्फवृष्टी झाली. भवनजवळ दीड इंच जाडीचा बर्फाचा थर साचला आहे. रविवारी रात्रीही बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.