आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Since 87 Years Railway's Per Hour Speed Increase

गेल्या ८७ वर्षांत ताशी ११ किमी वाढला रेल्वेचा सरासरी वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - रेल्वे देशात सुपर स्पीड बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, रेल्वे यंत्रणेतील सुधारणेसाठी स्थापन देबरॉय समितीने रेल्वेच्या आतापर्यंतच्या धिम्या आधुनिकीकरणावर प्रश्न उपस्थित केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, गेल्या ८७ वर्षांत रेल्वेचा सरासरी वेग केवळ ताशी ११.३ किमी वाढू शकला.

समितीने सरकारला नुकत्याच सोपवलेल्या अहवालात गोल्डन टेंपल मेल (आधीची फ्रंटियर मेल) रेल्वेवर केस स्टडी केली आहे. ही रेल्वे १९२८ मध्ये मुंबईहून अमृतसरला सरासरी ताशी ४७.६ किमी वेगाने पोहोचली होती. आता ती ताशी ५८.९ किमी वेगाने पाेहोचते. सध्या सुपरफास्ट रेल्वेचा वेग १०० ते १३० किमीपर्यंत असल्याचा दावा केला जातो.

विविध आधुनिकीकरणानंतरही रेल्वे प्रवासाचा वेळ का कमी करू शकली नाही, असा सवाल समितीने उपस्थित केला. रेल्वे मंत्रालयाने सप्टेंबर २०१४ मध्ये माेठ्या रेल्वे प्रकल्पातील स्रोतांचा उपयोग, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाच्या फेररचनेवर अहवाल तयार करण्यासाठी विवेक देबरॉय यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने सुधारणा करण्याच्या शिफारशी अहवालात दिल्या होत्या.

प्रवाशांकडून सुपरफास्ट आणि एक्स्प्रेसचे भाडे घेतले जाते, मात्र रेल्वे मेल आणि एक्स्प्रेसच्या वेगाने इच्छित स्थळी जाते. देशात सर्वात वेगवान रेल्वे दिल्ली-भाेपाळ शताब्दी आणि दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेस आहे. त्या अनुक्रमे १२०-१३० किमी प्रतितास वेगाने धावतात. सेमी बुलेट रेल्वेच्या वेगाची चाचणी दिल्ली ते आग्रादरम्यान झाली. तिचा जास्तीत जास्त वेग ताशी १६० किमी होता. असे असले तरी या रेल्वेचाही सरासरी वेग ताशी १०० किमी आहे.