आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवरील व्हायरल गाण्याने बनवले चंद्रलेखाला गायिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रलेखा अडूर, गायिका
लव्ह स्टोरीमध्ये गायलेल्या पहिल्या गाण्याचे मार्चमध्ये विमोचन झाले. 2 चित्रपटांत गाणी गायिली आहेत.

केरळच्या परक्कोडे गावच्या चंद्रलेखा अडूरला वर्षभरापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. मात्र, इंटरनेटमुळे रात्रीतून ती देश-विदेशात प्रकाशझोतात आली. ओणममध्ये तिने गायलेल्या गाण्याने यूट्यूब आणि फेसबुकवर एवढी धूम केली की ती आज पार्श्वगायिका झाली आहे. असे असले तरी तिने संगीताचे कोणतेही शिक्षण घेतले नाही. 2012 मध्ये ओणम सणासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. सर्वांच्या आग्रहावरून तिने दोन दशकांपूर्वीच्या ‘राजाहमसमे’ चित्रपटातील गाणे ऐकवले. त्यांच्या दिराला गाणे एवढे आवडले की त्याचा त्यांनी व्हिडिओ बनवला. 22 सप्टेंबर 2012 मध्ये यूट्यूबवर तो अपलोड केला. वर्षभरात केवळ 412 लाइक मिळाल्या. फेसबुकवरील काही मित्रांनी तो शेअर केला. यानंतर 1 ऑक्टोबर 2013 मध्ये एका एनआरआय प्रवीणने हे गाणे आपल्या फेसबुक वॉलवर टाकले. यानंतर इंटरनेटवर ते व्हायरल झाले. तीन दिवसांत तीन लाखांहून जास्त लोकांनी गाणे ऐकले. यानंतर प्रकाश नावाच्या व्यक्तीने गाणे डाउनलोड करून 12 ऑक्टोबरला गाणे पुन्हा यूट्यूबवर अपलोड केले. या वेळी त्यास सात लाख हिट्स मिळाल्या होत्या. कतारमध्ये राहत असलेले केरळचे व्यावसायिक प्रशांत पिल्लई यांनी संपूर्ण रात्रभर हे गाणे ऐकले.

चंद्रलेखाला इंटरनेटवर लाखो लोक ऐकत होते आणि संदेशही पाठवत होते. मात्र याची तिला कल्पना नव्हती. नातेवाइकांकडून याची माहिती मिळाल्यानंतर तिने आपला मोबाइल नंबर नेटवर टाकला. यानंतर तिच्या फोनच्या घंटीचा खणखणाट चालूच राहिला. देश-विदेश, मीडिया आणि चित्रपट संगीतकारांकडून शुभेच्छा संदेश मिळू लागले. यादरम्यान, लव्ह स्टोरी चित्रपटाच्या संगीतकाराने तिला गाण्यासाठी ऑफर दिली.