आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 व्या वर्षी हरवले पितृछत्र, \'सॉलिड बॉडी\'ने बनविले स्टार, आता सुसाइडचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादुरगड (हरियाणा) - हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि रागिनी शैलीतील सिंगर सपना चौधरीने रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. आता सपनाची प्रकृती स्थिर आहे. सपना हरियाणाच नाही तर पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही फेमस आहे. 20 वर्षांच्या सपनाचे अवघ्या 12 व्या वर्षी पितृछत्र हरपले होते. मोठ्या संघर्षातून तिने गाणे आणि डान्सिंगमध्ये आपली कारकिर्द घडवली आहे. तिच्या या गुणांच्या जोरावरच तिने कुटुंबाचेही पालन पोषण केले.

काय आहे प्रकरण
सपना चौधरी हिने तीन महिन्‍यांपूर्वी गायिलेल्‍या एका गाण्‍यातून दलितांचा अपमान झाला, असा आरोप तिच्‍यावर आहे. या प्रकरणी 'निगाहें' या सामाजिक संस्‍थेचे अध्‍यक्ष नबाव सतपाल तंवर यांनी दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे गुडगाव पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला.
- यापूर्वी तिच्‍याविरुद्ध डोगरान पोलिस चौकीतही तक्रार दिली गेली होती.
- या तक्रारीत म्‍हटले, गुडगावच्‍या चक्करपूर परिसरात झालेल्‍या एका कार्यक्रमात सपना आणि तिच्‍या पथकाने रागिनी शैलीमध्‍ये 'जात-पात का बिगडग्या' हे गीत गावून दलितांचा अपमान केला.
- या गीतात जातीवाचक शब्‍द होते.
- सपनाचे हे वादग्रस्‍त गाणे यू-ट्यूबवरही अपलोड केले गले होते.
- या प्रकरणी संजय चौहान नावाच्‍या एका युवकानेही तक्रार दिली होती.

यूथमध्ये सपनाची प्रचंड क्रेझ
- लोकसंगीताचा बाज असलेली सपनाची गीते हरियाणा, पंजाबमध्ये प्रसिद्ध आहेत.
- सपनाचे पहिले गाणे 'सॉलिड बॉडी रै'. या गाण्याने सपनाला काही दिवसांमध्येच हरियाणामध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर बसविले.
- युवकांमध्येतर सपनाची प्रचंड क्रेझ आहे. जेव्ही तिचा कार्यक्रम असतो तेव्हा लोक इतर कलाकार स्टेजवर आल्याबरोबर सपनाला बोलावण्याचा आग्रह धरतात.
- एका शासकीय कार्यक्रमात सपना आणि राज्याचे परिवहन मंत्री कृष्ण पंवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकांनी मंत्री महोदयांना दोन मिनीट बोलण्याचीही संधी दिली नाही आणि सपनाचा कार्यक्रम सुरु करण्याचा आग्रह धरला.
- बहादूरगडमधील एका कार्यक्रमात सपनाला पाहाण्यासाठी आणि तिचे गाणे ऐकण्यासाठी लोक घरांच्या छतावर, झाडांवर चढले होते.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या कोण आहे सपना....
> कोणी केले सपनावर आरोप...
> सतपालने फेसबुकवर सुरु केले सपनाविरोधात अभियान...
बातम्या आणखी आहेत...