आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत शिखांच्या सन्मानार्थ ‘सिंह अॅॅण्‍ड कौर’ पार्क; हिंसाचारात मारले गेले होतेे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- शिखांनी आपल्या कामाने जगात मोठे नाव आणि आदर मिळवला आहे. विदेशी लष्करात मोठे पद मिळवले, अनेक देशांच्या संसदेत ते प्रमुख पदांवर आहेत. आता अमेरिकेच्या एलिक ग्रूव्ह प्रांतातील सॅक्रामेंट्रो काउंटीत पाच वर्षांपूर्वी मारल्या गेलेल्या गुरमेज अटवाल आणि सुरिंदर सिंह यांच्या सन्मानार्थ एक पार्क तयार होत अाहे. त्याचे नाव ‘सिंह अँड कौर’ असेल.
सिंह म्हणजे वनराज आणि कौरचा अर्थ सिंहीण असा होतो. ते त्यांच्या शौर्याचे प्रतीक असते. प्रत्येक शीख पुरुष व महिलेच्या नावासोबत ते जोडलेले असते. त्यामुळे या पार्कचे नाव ‘सिंह अँड कौर’ ठेवण्यात आले आहे. अमेरिकेतील हे असे पहिले पार्क असेल. ते कॅलिफोर्नियात शिखांच्या १०० वर्षांच्या बलिदानाचे प्रतीक असेल. हे पार्क पाच एकरमध्ये तयार होईल. त्यासाठी जमिनीची निवडही झाली आहे. त्यावर एकूण २० लाख डॉलर (१३.४० कोटी रुपये) खर्च होईल. पार्कमध्ये गुरमेज आणि सुरिंदर सिंह यांचे स्मारकही असेल. पार्कचा एक भाग सुरिंदर सिंह आणि दुसरा भाग गुरमेज सिंह अटवाल यांना समर्पित असेल. त्याचे काम २०१८ मध्ये सुरू होईल. तोपर्यंत लँड स्केपिंग आणि इतर डिझाइन तयार केले जाईल. दोन्ही ज्येष्ठ शिखांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार होणाऱ्या या पार्कसाठी सर्वात आधी अमेरिकन शीख पब्लिक अफेअर्स असोसिएशनने नामांकन भरले होते. या मागणीच्या बाजूने ऑनलाइन सपोर्ट मोहीमही सुरू झाली. स्थानिक नागरिक आणि संघटनेचे मंडळ सचिव अमर शेरगिल म्हणाले, ‘प्रशासनाने सिंह आणि कौर पार्क बनवण्याचा प्रस्ताव मंजूर केला याचा आम्हाला अभिमान आहे.’ गुरमेज अटवाल यांचे चिरंजीव कमलजित अटवाल म्हणाले की, वडिलांच्या खुनाचे दु:ख अजूनही जाणवते. संपूर्ण कुटुंब शहर प्रशासनाने दिलेल्या सन्मानामुळे खुश आहे.
बातम्या आणखी आहेत...