आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिण म्हणाली- पत्नीला सोडून माझ्याशी ठेवत होता संबंध, म्हणून केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपेत असलेल्या भावाची गळा चिरून हत्या केल्याची कबुली बहिणीने दिली. - Divya Marathi
झोपेत असलेल्या भावाची गळा चिरून हत्या केल्याची कबुली बहिणीने दिली.
लखनऊ - उत्तर प्रदेशाच्या राजधानीत शुक्रवारी एका बहिणीने सख्ख्या भावाची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर 100 क्रमांक डायल करुन घटनेची माहिती पोलिसांना दिली. युवतीने सांगितले की भाऊ पत्नीपासून वेगळा राहात होता आणि माझ्यावर बळजबरी करुन संबंध ठेवत होता. या अत्याचारामुळे वैतागलेल्या बहिणीने भावाचा खून केला. पोलिसांनी युवतीला अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेल्या घरगुती वस्तू जप्त केल्या आहे.

काय आहे प्रकरण
- लखनऊच्या मडियांव भागात 24 वर्षांचा फिरोज (नाव बदलले आहे) त्याची लहान बहिण रेशमा (बदललेले नाव) सोबत राहात होता.
- काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. भाजीपाला विक्री करुन ते उदरनिर्वाह करत होते.
- फिरोजचा मोठा भाऊ मोहम्मद त्याच्या कुटुंबासह वेगळा राहातो, तर मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.
- शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता हत्येची आरोपी रेशमाने 100 क्रमांक डायल करुन फिरोजची हत्या केल्याची माहिती दिली.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रेशमाला ताब्यात घेतले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला.
- घटनास्थळावरुन पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली लोखंडी फुंकणी, चाकू जप्त केला आहे.
भावावर केला शोषणाचा आरोप
- पोलिस अधीक्षक मंजिल सैनी यांनी सांगितले, की अटक केलेल्या युवतीने मृत भावावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
- युवतीची चौकशी सुरु असून तिने दिलेल्या प्राथमिक जबाबात म्हटले आहे, की फिरोज तिच्यावर बळजबरी करायचा. लोकलज्जेमुळे मी शांत होते. कुठेच काही बोलले नाही.
- फिरोजच्या अत्याचाराने युवती वैतागली होती. यातूनच तिने भावाची गळा चिरून हत्या केली.
पोलिस काय म्हणाले
- लखनऊच्या पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहाणी केली.
- अटकेत असलेल्या युवतीकडे त्यांनी चौकशी केली. त्यानुसार, हत्या जमीनीच्या वाटणीतून झाली असण्याची शक्यता व्यक्त केली.
- युवतीने जमीनीच्या वादासोबतच अनेक गोष्टी सांगितल्या, पोलिस प्रत्येक पैलूंचा बारकाईने तपास करीत आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी काय म्हणाली युवती...
> पोलिसांच्या पचणी पडेना युवतीचा दावा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...