आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मेहुणींनी काठीने बेदम मारून घेतला भावजीचा जीव, एका मेहुणीने सांगितले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरनगर - घरगुती वादात रविवारी दोन मेहुणींनी भावजीची काठीने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. मृत तरुणाच्या आईने मेहुणींवर खुनाचा आरोप केला आहे. दुसरीकडे, एका मेहुणीचा आरोप आहे की, तिचा भावजी नेहमी छेडाछाड करत होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवून मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना मुझफ्फरनगरच्या शाहपूरची आहे. मृत युवकाची आई सरोज यांनी आरोप केला की, मृत उपेंद्रची पत्नी त्याच्याशी नेहमी भांडणे करत होती.
- तिच्या दोन बहिणी येथे आलेल्या होत्या. त्या आपल्या बहिणीची बाजू घेऊन भांडायच्या. हा वाद एवढा वाढला की, हाणामारी सुरू झाली.
- यादरम्यान मेहुणींनी काठीने हल्ला केला आणि उपेंद्रच्या डोक्यात जोरदार वार केला. गंभीर वार असल्याने उपेंद्रचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर घरात गोंधळ माजला.
- घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

 

मेहुणीने भावजीवर केले हे आरोप 
- मृत उपेंद्र मेहुणी सर्वात आधी पोलिसांत तक्रार घेऊन गेली. तिचा आरोप होता की, भावजी उपेंद्र तिची छेडछाड करत होता.
- यामुळे घरात मोठा वाद झाला. प्रकरण एवढे वाढले की, लाठी-काठीने मारहाण होऊ लागली. या घटनेत उपेंद्रचा मृत्यू झाला.

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- एसपी ग्रामीण अजय सहदेव म्हणाले, कौटुंबिक कलहात वाद खूप वाढला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. उपेंद्र ऊर्फ फूल सिंहला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
- याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दोन्ही मेहुणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...