आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- 'मिशनरीज ऑफ चॅरिटी'च्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने कोलकात्यात आज (मंगळवार) निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या.
मदर तेरेसा यांच्या पश्चात सिस्टर निर्मला यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीचे नेतृत्त्व सांभाळले होते. सिस्टर निर्मला या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्याच्या उपचारही सुरू होते. मात्र, हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने होती. सिस्टर निर्मला यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दु:ख व्यक्त केले आहे. 'सिस्टर निर्मला या नेहमी स्मरणात राहातील', असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

मदर तेरेसांचे काम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध - सिस्टर प्रेमा
मदर तेरेसांचे कार्य पुढे चालविण्यासाठी कटिबद्ध राहीन, असे येथील मिशनरी ऑफ चॅरिटीजच्या (एमओसी) नवनिर्वाचित प्रमुख मॅरी प्रेमा यांनी म्हटले आहे. प्रकृती खालावल्यामुळे सिस्टर निर्मला यांनी मिशनरीज अॉफ चॅरिटीचे प्रमुखपद सोडले होते. सिस्टर मॅरी प्रेमा यांच्याकडे प्रमुखपद सोपविण्यात आले होते.

मदर तेरेसाहचे महान कार्य सिस्टर निर्मला यांनी पुढे नेले. आता मी देखील सिस्टर निर्मला यांच्या पावलांवर चालणार आहे. या मार्गावर परमेश्वर मला मार्गदर्शन करेल, अशी भावना सिस्टर प्रेमा यांनी व्यक्त केली आहे.

पुढील स्लाडवर क्लिक करून वाचा, म‍िशनरीजमधील पहिली हिंदु महिला सिस्टर निर्मला....