आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sisters Killed After Alleged Gang Rape In UP BJP Slams SP Government

उत्तरप्रदेशात गॅंगरेपनंतर अल्पवयीन दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन अल्पवयीन बहिणींवर सामुहीक बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करून दोन्ही बहिणींचे मृतदेह शेतातील एका झाडाला लटकवण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आता उत्तरप्रदेशात राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव सरकारवर भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला आहे.

मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेकडे उत्तरप्रदेश सरकारने कानाडोळा केल्याचा आरोप भाजपचे नेते लक्ष्‍मीकांत वाजपेयी यांनी केला आहे. यूपी सरकारने आतापर्यंत या घटनेबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दुसरीकडे, राष्‍ट्रीय महिला आयोगाने या घटनेची गांर्भियाने दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत म्हणाल्या की, ही घटना हृदय पिळवटून आहे. या घटनेच्या चौकशीसाठी एनसीडब्‍ल्‍यूचे पथक पाठवले आहे.

बदायू जिल्ह्यातील कटरा सआदतगंज गावात ही घटना घडली. कथित मुली चुलत बहिणी होत्या. दोघी गेल्या सोमवारपासून बेपत्ता होत्या. मुलींवर सामुहीक बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. त्यानंतर दोघींना फासावर लटकवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला आहे. या घटनेकडे पोलिस हेतुपर्वक कानाडोळा करत असल्याचेही पीडित कुटूंंबियांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचे समजते.

मुलींच्या कुटूंबियांनी सांगितले, की मुली बेपत्ता झालीची तक्रार दाखल करण्यासाठी कटरा पोलिस ठाण्यात ते गेले होते. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. याशिवाय पोलिस ठाण्यातून हाकलून दिले. त्यानंतर दोन्ही मुलींनी गावातील एका झाडाला फाशी घेतल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल सर्वेश यादव यांनी दिली.

पोलिस अधिक्षक मानसिंह चौहान यांनी सांगितले, की 14 आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुली सोमवारपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या कुटूंबियांनी मंगळवारी दिवसभर दोन्ही मुलींचा शोध घेतला. परंतु त्या आढळून आल्यानंतर अखेर बुधवारी सकाळी दोघींचे मृतदेह गावातील एका शेतात झाडाला लटकलेले ‍आढळून आले. मुलींवर सामु‍हीक बलात्कार झाला आहे, की नाही याबाबत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.
कटरा पोलिस ठाण्याचे प्रभारी रामविलास यांच्यासह चार कॉन्स्टेबलला तडाकाफडकी निलंबित करण्‍यात आले आहे.

याप्रकरणी दोन आरोपींना अटक कराण्‍यात आली आहे. पप्पू आणि उर्वेश अशी त्यांची नावे आहेत. आरोपी अवधेश यादव हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा; घटनेशी संबंधित फोटोज...