आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश हत्या प्रकरण: तपासासाठी कर्नाटक सरकारकडून एसअायटी, सीबीआयचा पर्यायही खुला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू -हिंदुत्ववादी राजकारणाला कायम विरोध करून बिनधास्त मते मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार व ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका गौरी लंकेश यांची मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या घरासमोरच गोळ्या घालून हत्या केली. विशेष म्हणजे कलबुर्गी, पानसरे व दाभोलकर यांनाही याच पद्धतीने जवळून गाेळ्या घालून मारण्यात अाले हाेते. दरम्यान, कर्नाटक सरकारने या हत्येच्या तपासासाठी महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

बुधवारी गौरी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार गौरी यांच्या हत्येने देशभर खळबळ माजल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या निर्देशांनुसार गृहसचिव राजीव गोबा यांनी कर्नाटक सरकारला याबाबत अहवाल मागितला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे. 

पत्रकार गौरी गाडीतून उतरून घरात प्रवेश करत असताना हेल्मेट घातलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या प्रकरणी फेसबुकवर गौरी यांच्या विरोधातील एका पोस्टच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ बंगळुरू, दिल्लीसह देशातील अनेक शहरांत बुधवारी पत्रकार संघटनांनी निदर्शने केली. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानेही कर्नाटक सरकारला याबाबत अहवाल मागितला.

लोकशाहीची हत्या -राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. देशात हिंसाचारउर्वरित घडवणाऱ्यांना पंतप्रधान वारंवार इशारे देत असतात. मात्र, हा केवळ देखावा असल्याची टीका राहुल यांनी केली. दबाव वाढला तरच पंतप्रधान बोलतात, असे राहुल यांनी म्हटले आहे.

ही राज्याची जबाबदारी  - गडकरी
कायदा-सुव्यवस्था राखणे ही राज्याची जबाबदारी आहे. ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पेलली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. मोदींबाबत राहुल यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, ‘मोदी एका पक्षाचे नव्हे, देशाचे पंतप्रधान आहेत.’ दरम्यान, भारतातील अमेरिकी वकिलातीने गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...